शहरं
Join us  
Trending Stories
1
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : ससूनची दीनानाथ रुग्णालयासह डॉ. घैसास यांना ‘क्लीन चिट’
2
अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का? सुनील तटकरे म्हणाले...
3
देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा २०२४ च्या विजयाला आव्हान; हायकोर्टाने समन्स बजावले
4
VIDEO: परप्रांतीय विक्रेत्याने गटारात धुतले ताडगोळे; खेडमधील किळसवाणा प्रकार
5
...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली
6
वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा
7
भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने शोधला एलियन्सचं वास्तव्य असलेला ग्रह, संशोधनानंतर केला दावा
8
“जनतेला फसवणाऱ्या महायुती सरकारविरोधात लढाई तीव्र करणार”; मुंबई बैठकीत काँग्रेसचा निर्धार
9
महेश मांजरेकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर; मुक्ता बर्वे, काजोलचाही होणार सन्मान
10
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
11
"....म्हणून मी तिला देणार नाही घटस्फोट’’,  होणाऱ्या जावयासोबत पळाळेल्या महिलेच्या पतीनं सांगितलं कारण
12
कोकणची राणी होत Ratnagiri Jets मधून नव्या प्रवासाला निघाली स्मृती मानधना
13
मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर, ओटीटीवर सुपरफ्लॉप; 'छावा'ची नेटफ्लिक्सवर वाईट अवस्था
14
स्वारगेट प्रकरणात मोठी अपडेट..! आरोपी दत्ता गाडेविरोधात 893 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
15
५० कोटींचा 'तो' श्वान निघाला भारतीय जातीचा; ईडीने धाड टाकल्यावर मालकाने सगळेच सांगितले
16
उदयनराजे, उद्धव ठाकरेंच्या मागणीला संभाजीराजेंचे समर्थन; म्हणाले, “किल्ल्यांचे जतनही व्हावे”
17
जमिनीवर भिंतीवर आपटले, मन भरलं नाही म्हणून दगडाने ठेचले; श्वान प्रेमीने केली पाच पिल्लांची हत्या
18
रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका 'या' ३ गोष्टी; सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टचा मोलाचा सल्ला
19
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सच्या संघात 'मारिया शारापोवा'; MS Dhoni शी आहे खास कनेक्शन
20
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 

वाशिम : २४६ महिला सरपंच पदांचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 11:16 IST

Washim Gram panchayat Reservation २४६ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. 

ठळक मुद्देसार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम ११ डिसेंबर राेजी जाहीर करण्यात आला. ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापण्यास प्रारंभ झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम ११ डिसेंबर राेजी जाहीर करण्यात आला. कार्यक्रम जाहीर हाेताच निवडणूक हाेत असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात ४९० ग्रामपंचायतींची निवडणूक हाेत आहे. ७ डिसेंबर व ११ डिसेंबर राेजी सरपंचपदाचे आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. सन २०२० ते २०२५ दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाकरिता महिला आरक्षण सोडत  ११ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी श्ण्मुखराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन इमारतीमध्ये झाली. या सोडतीद्वारे जिल्ह्यातील एकूण ४९० ग्रामपंचायतींपैकी २४६ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. यापैकी अनुसूचित जातीमधील महिलांसाठी ५०, अनुसूचित जमातीमधील महिलांसाठी २०, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी ६६ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ११० ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षित राहणार आहे.या आरक्षण सोडतीवेळी उप-जिल्हाधिकारी (महसूल) सुनील विंचनकर यांच्यासह तहसीलदार, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.जिल्हयातील ४९० ग्रामपंचायतीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापण्यास प्रारंभ झाला असून चर्चा रंगतांना दिसून येत आहेत. जाहीर आरक्षणाचा काहींना फटकाजिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाकरिता जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये अनेक इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फिरल्याची चर्चा आरक्षण जाहीर झाल्यानंतर ऐकावयास मिळाली. काही इच्छुक उमेदवारांनी तर ज्या क्षेत्रात निवडणूक लढायची तयारी केली हाेती ते आरक्षणच बदलल्याने केलेली मेहनत व्यर्थ गेली, तर काहींना अपेक्षित आरक्षण निघाल्याने फायद्याचे राहिले.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत