शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

Washim: रजा घेऊन घरी परतला; अपघातात मृत्यू ओढवला, ट्रक-दुचाकी अपघातात धोत्रा येथील जवानाचा मृत्यू

By सुनील काकडे | Published: June 17, 2023 6:56 PM

Washim: ट्रकने दुचाकी वाहनास जबर धडक दिल्याने घडलेल्या अपघातात धोत्रा येथील रहिवासी तथा सैन्यदलात कार्यरत योगेश सुनील आढोळे (२४) या जवानाचा मृत्यू झाला.

- सुनील काकडेवाशिम : ट्रकने दुचाकी वाहनास जबर धडक दिल्याने घडलेल्या अपघातात धोत्रा येथील रहिवासी तथा सैन्यदलात कार्यरत योगेश सुनील आढोळे (२४) या जवानाचा मृत्यू झाला. ही घटना १६ जून रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास पोटी फाट्यावर घडली. विशेष म्हणजे योगेश हा एक दिवसापूर्वीच रजा घेऊन गावी परतला होता.

युवराज मनवर (धोत्रा) यांनी यासंदर्भातील फिर्यादीत नमूद केले आहे की, १६ जून रोजी सांयकाळी पाच वाजता योगेश आढोळे हा दुचाकी वाहनाने (क्रमांक एम.एच. ३०, ए.एस. २८२१) कारंजा येथे गेला होता. रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास मंगरूळपीर येथे नोकरीला असलेले लाईनमन सुनील भगत यांनी घरी येऊन योगेशचा अपघात झाल्याचे सांगितले. मंगरूळपीरवरून कारंजाकडे जाणाऱ्या एम.एच. २७, बी.एक्स. ११९१ क्रमांकाच्या ट्रकने योगेशच्या दुचाकी वाहनास जोरदार धडक मारली असून तो अपघातस्थळी बेशुद्धावस्थेत पडून असल्याचे त्यांनी कळविले. त्यावरून तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी अवस्थेतील योगेशला मंगरूळपीरच्या शासकीय रुग्णालयात भरती केले. तेथील डॉक्टरांनी योगेशला मृत घोषित केले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून मंगरूळपीर पोलिसांनी ट्रक चालकावर भादंविचे कलम २७९, ३०४ ‘अ’, सह कलम १८४ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

जवानाप्रती प्रशासकीय यंत्रणेची उदासिनतासैन्यदलात कार्यरत असल्याने मृतक योगेश सुनील आढोळे याच्या पार्थिवावर शासकीय इतमामात बंदूकीच्या फैरी झाडून विधीवत अंत्यसंस्कार व्हायला हवे होते. प्रत्यक्षात मात्र तसे काहीच झाले नाही. धोत्रा येथे त्याचे कुटूंब आणि गावकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केल्याचे पाहावयास मिळाले.

टॅग्स :washimवाशिम