शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

वाशिम : ग्रामीण भाग कोरोनामुक्त; शहरात केवळ एक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 4:33 PM

Corona Cases in Washim : गत १३ दिवसांत वाशिम शहरात एक रुग्ण आढळला तर ग्रामीण भगाात एकही रुग्ण आढळला नाही.

वाशिम : आॅगस्ट महिन्यात कोरोनाचा आलेख आणखी घसरला असून, गत १३ दिवसांत वाशिम शहरात एक रुग्ण आढळला तर ग्रामीण भगाात एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे ग्रामीण भाग तुर्तास तरी कोरोनामुक्त ठरला असून, शहरही कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे.जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात गतवर्षी जून महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. पहिल्या लाटेत एप्रिल ते आॅक्टोबर या दरम्यान इतर शहरांच्या तुलनते वाशिम शहरात अधिक संख्येने रुग्ण आढळले होते. दुसºया लाटेत मार्च ते मे २०२१ या कालावधीत वाशिम शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. आॅक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी अनेकांना वेटींगवर राहण्याची वेळ आली होती. जून महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, आॅगस्ट महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येत आहे. २९ जुलै ते १० आॅगस्ट या १३ दिवसांत वाशिम शहरात केवळ एक कोरोना रुग्ण आढळून आला. ग्रामीण भागात एकही रुग्ण आढळून आला नाही. या दरम्यान कोरोनामुळे एकही मृत्यू नसल्याने तालुकावासियांची चिंता बºयाच अंशी कमी होत आहे. सर्वांच्या सहकार्यातून शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावरप्रशासन, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक आदींच्या सहकार्यातून वाशिम तालुक्यातील ग्रामीण भाग कोरोनामुक्त झाला तर शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. कोरोना नियंत्रणात असल्याने निर्बंध आणखी शिथिल झाले आहेत. रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा आहे. कोरोनाच्या तिसºया लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी नागरिकांनी यापुढेही कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे अपेक्षीत आहे. कोरोनाला वेशीवरच रोखण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये, दुकानात एकाच वेळी पाच पेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये, दुकानात तापमापक व सॅनिटायझर ठेवण्यात यावे, या सूचनांची दुकानदारांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन तालुका प्रशासन व आरोग्य विभागाने केले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या