शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीचा मुंबईतल्या जागांचा फॉर्म्युला ठरला; अजित पवार गटाला ३ जागा तर भाजपा, शिवसेनेला...
2
जस्टिन ट्रुडोंच्या अडचणीत वाढ, कॅनडाचा अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये सामील; भारताने फोटो आणि नाव पाठवले
3
जाहीर सभेत राहुल गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य, भाजप आमदारावर गुन्हा दाखल
4
मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार! अतिरेक्यांनी गावात केले बॉम्बस्फोट
5
अतुल परचुरेंच्या निधनानंतर नरेंद्र मोदींचं सोनिया परचुरेंना भावनिक पत्र, म्हणाले- "या कठीण काळात..."
6
दिवाळीपूर्वी 'या' बँकेचा ग्राहकांना झटका, सेव्हिंग अकाऊंटवरील व्याजदरात कपात, नवे दर काय?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस-ठाकरे गटातील वाद मिटणार? प्रभारी रमेश चेन्नीथला ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
8
"गांधी कुटुंबाने माझ्याविरोधात निवडणूक लढवून ३ लाख मतं मिळवावीत, मी राजकारणातून संन्यास घेईन"
9
बियर्ड हटाओ, प्यार बचाओ! कॉलेजमधील मुलींचं आंदोलन; म्हणाल्या, गर्लफ्रेंड हवी की दाढी...
10
एअर डिफेन्स भेदत नेतन्याहू यांच्या निवासस्थानाजवळ कोसळलं लेबेनॉनमधून आलेलं ड्रोन, इस्राइलमध्ये खळबळ   
11
डंका तर BSNL चाच वाजणार! मोबाईलवर ३६००० किमीवरून मेसेज आला, हॅलो इंडिया; नवी स्वदेशी टेक्निक...
12
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
13
"संजय राऊत आणि आमच्यात वाद नाही, पण..." नाना पटोले यांनी स्पष्ट केली भूमिका
14
Rishabh Pant नं साधला मोठा डाव; MS धोनीचा विक्रम मोडित काढत ठरला 'नंबर वन'
15
गर्लफ्रेंडच्या घरी प्रेमीयुगुलाची भेट, पण कुटुंबीयांनी रंगेहाथ पकडलं; बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं...
16
एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची
17
OTT साठी Reliance ची मोठी तयारी, JioCinema चं डिस्ने+ हॉटस्टारमध्ये विलीनीकरण होणार
18
दीड, दोन गुंठ्यात बांधलेले अप्रतिम घर; हॉल, बेडरुमही प्रशस्त... कसे बांधाल, एकदा पाहूनच घ्या ना...
19
खेडमध्ये सर्वपक्षीय विरोधक एकवटले, दिलीप मोहिते-पाटलांविरोधात देणार नवा पर्याय
20
नारायण मूर्तींनी टाटांचा दयाळू उद्योजक म्हणून केला उल्लेख; सांगितला १९९९ चा 'तो' किस्सा

Washim: संसारातील संकटांवर केली तिने मात; पण ‘किडनी फेल’च्या संकटापुढे टेकले हात!

By सुनील काकडे | Published: October 27, 2023 8:52 PM

Washim News: घरी अठराविश्व दारिद्रय, मोलमजूरी करणाऱ्या घरधन्याची कमाई तरी काय असणार? पण त्या माऊलीने थोड्याथोडक्या पैशांतून संसार सावरला, संसारातील संकटांवर तिने लिलया मात केली.

- सुनील काकडेवाशिम  - घरी अठराविश्व दारिद्रय, मोलमजूरी करणाऱ्या घरधन्याची कमाई तरी काय असणार? पण त्या माऊलीने थोड्याथोडक्या पैशांतून संसार सावरला, संसारातील संकटांवर तिने लिलया मात केली. पोटी असलेली एक मुलगी आणि दोन मुलांचा सांभाळ करताना चेहऱ्यावरचे दु:ख कधीही दिसू दिले नाही; पण अवघ्या ३५व्या वर्षी तिच्या दोन्ही किडनी फेल झाल्या. किमान एक किडनी तरी ‘ट्रान्सप्लान्ट’ करावी लागेल, असे डाॅक्टरांनी सांगितले; मात्र महत्प्रयास करूनही त्याला अद्याप यश आलेले नाही. सध्या वनमालाबाई ‘डायलिसीस’वर असून पती आणि वडील तिला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करित आहेत.

शहरातील शुक्रवारपेठ भागातील राजनी चाैकात वास्तव्यास असलेले विठ्ठल इंगळे यांची मुलगी वनमालाबाई यांचा विवाह मंगरूळपीर येथील घनश्याम खिराडे यांच्याशी साधारणत: १८ वर्षांपूर्वी झाला. लग्नानंतर या दाम्पत्यास एक मुलगी आणि दोन मुले झाली. मुलगी विवाहयोग्य झाली असून दोन मुले सध्या लहान आहेत. वनमालाबाईंचे पती घनश्याम हे मिळेल तिथे रोजंदारीने मजूरीचे काम करतात. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती जेमतेमच आहे. परिणामी, पाच सदस्यांच्या कुटूंबाचे पालनपोषण करताना नाकीनऊ येतात. अशात वनमालाबाईंना वर्षभरापूर्वी पोटात दुखत असल्याचे जाणवले.

कालांतराने त्रास अधिकच बळावत गेला. उपचार सुरू होते; मात्र त्याचा प्रभाव दिसून आला नाही. दोन महिन्यांपूर्वी त्रास अधिकच वाढल्याने अखेर वडील विठ्ठल इंगळे यांनी वनमालाबाईंना मुंबई येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे विविध चाचण्या केल्यानंतर तिच्या दोन्ही किडनी निकाली झाल्याची बाब निष्पन्न झाली.

दोन्ही नाही; पण किमान एका किडनीचे तरी प्रत्यारोपण करण्याची गरज आहे; अन्यथा वनमालाबाईंना वाचविता येणे अशक्य असल्याचे डाॅक्टरांनी जाहीर केले आहे. मात्र, महत्प्रयास करूनही किडनी मिळाली नसल्याने ‘डायलिसीस’वर असलेल्या वनमालाबाईंची प्रकृती ढासळत चालल्याने कुटूंबियांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :washimवाशिम