लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार : येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालयात पुर्णवेळ कनिष्ठ अभियंता नसल्यामुळे विद्युतच्या समस्या उद्भवल्या असून त्याकडे महावितरणचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. मंगरूळपीर येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत एका महिलेकडे शेलुबाजारचाही प्रभार असून त्या येथे कधीकधीच येतात. ही बाब लक्षात घेवून कायमस्वरूपी अभियंता मिळण्यासह विद्युतच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करा; अन्यथा बंद राहणार्या महावितरणच्या येथील कार्यालयाचे कुलूप तोडो आंदोलन करू, असा इशारा अर्जुन भिमराव सुर्वे यांनी २७ डिसेंबर रोजी अधीक्षक अभियंता यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात दिला आहे.शेलुबाजारला स्वतंत्र कनिष्ठ अभियंता नसल्याने येथील कार्यालय कामकाजाच्या वेळेत बंदच असते. परिणामी, नागरिकांना विजेच्या समस्या कुणाकडे मांडाव्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तथापि, शेलुबाजार येथे कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता द्यावा, कार्यालयाचे कामकाम दैनंदिन सुरळीत सुरू करावे. येत्या १५ दिवसांत समस्या निकाली न निघाल्यास कामकाजाच्या वेळेत बंद राहणारे कार्यालय फोडण्यात येईल. नागरिकांच्या या रोषाला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जबाबदार राहील, असा इशारा सुर्वे यांनी दिला आहे.
वाशिम : अनियमित विद्युत पुरवठा व अन्य समस्यांमुळे शेलुबाजारवासी हैराण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 8:07 PM
शेलुबाजार : येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालयात पुर्णवेळ कनिष्ठ अभियंता नसल्यामुळे विद्युतच्या समस्या उद्भवल्या असून त्याकडे महावितरणचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.
ठळक मुद्देशेलुबाजार कार्यालयाचा प्रभार मंगरुळपीर कनिष्ठ अभियंत्यांकडे कामकाजाच्या वेळेत कार्यालय बंद राहत असल्यामुळे आंदोलनाचा इशारा