शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
2
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
3
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
5
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
6
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
7
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
8
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
9
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
10
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
11
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
12
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
13
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
14
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
15
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
16
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
17
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
18
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
19
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
20
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

अमरावती विभागात वाशिम अव्वल!

By admin | Published: May 31, 2017 1:10 AM

वाशिम जिल्ह्याचा इयत्ता बारावीचा ९१.३१ टक्के निकाल : रिसोड तालुका आघाडीवर, तर मानोरा तालुका माघारला!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत वाशिम जिल्ह्याचा निकाल ९१.३१ टक्के लागला असून, अमरावती विभागात वाशिम जिल्हा पहिल्या स्थानावर आला आहे. मागील वर्षी वाशिम जिल्हा ८५.०२ टक्के निकालासह विभागात चौथ्या क्रमांकावर होता.जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १७ हजार ७४३ नियमित विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी १७ हजार ७३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १६ हजार १९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९१.३१ अशी आहे. उत्तीर्ण १६ हजार १९३ विद्यार्थ्यांमध्ये ९५२८ मुले व ६६६५ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.९० तर मुलींची टक्केवारी ९३.४१ अशी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल रिसोड तालुक्याचा ९४.१९ टक्के लागला आहे. त्याखालोखाल वाशिम तालुका ९२.५१ टक्के, कारंजा तालुका ९२.३० टक्के, मंगरूळपीर तालुका ९१.२१ टक्के, मालेगाव तालुका ८८.३८ टक्के तर मानोरा तालुक्याचा सर्वात कमी अर्थात ८४.९० टक्के निकाल लागला आहे.वाशिम तालुक्यात २४०६ मुले व १६६६ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी २१८१ मुले व १६८६ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९०.६५ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.२० अशी आहे. मालेगाव तालुक्यात १५०३ मुले व ८३७ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १३०७ मुले व ७६१ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८६.९६ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९०.९२ अशी आहे. रिसोड तालुक्यात २६७५ मुले व १६०९ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी २५०६ मुले व १५२९ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९३.६८ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.०३ अशी आहे. कारंजा तालुक्यात १४६० मुले व ११७८ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १३१८ मुले व १११७ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९०.२७ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.८२ अशी आहे. मंगरूळपीर तालुक्यात १३४७ मुले व १०६६ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १२१० मुले व ९९१ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८९.८३ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९२.९६ अशी आहे. मानोरा तालुक्यात १२०८ मुले व ७७९ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १००६ मुले व ६८१ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८३.२८ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ८७.४२ अशी आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९७ टक्के, कला शाखेचा ८६.३३ टक्के, वाणिज्य शाखेचा ९४.९४ टक्के तर व्होकेशनल शाखेचा ८९.३७ टक्के निकाल लागला आहे. ११ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यावर्षी इयत्ता बारावीच्या पुनर्परीक्षार्थींचा निकाल ४३.६९ टक्के लागला आहे. रिसोड तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावरमागील वर्षी जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिसोड तालुक्याने यंदा प्रथम क्रमांकावर येण्याचा मान पटकावला आहे. गतवर्षी क्रमांक एकवर असलेला मंगरूळपीर तालुका यंदा चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. गतवर्षी पाचव्या स्थानावर असलेला मानोरा तालुका यावर्षी सहाव्या स्थानावर गेला आहे. गतवर्षी चौथ्या स्थानावर असलेला मालेगाव तालुका यावर्षी पाचव्या स्थानावर गेला आहे. गतवर्षी तिसऱ्या स्थानावर असलेल्या वाशिम तालुक्याने यावर्षी दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. गतवर्षी सहाव्या स्थानावर असलेला कारंजा तालुका यावर्षी तिसऱ्या स्थानावर आला आहे.गतवर्षीप्रमाणेच मुलींनी मारली बाजी! गतवर्षीच्या बारावीच्या निकालात टक्केवारीच्या दृष्टीने मुलींनीच बाजी मारली होती. यावर्षीही टक्केवारीत अव्वल राहण्याची परंपरा कायम ठेवत मुलींनी चारच्या आसपास अधिक टक्केवारी मिळविली आहे. यावर्षी मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९३.४१ अशी आहे तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.९० अशी आहे. गतवर्षी मुलांची उत्तीर्णची टक्केवारी ८२.९९ तर मुलींची उत्तीर्णची टक्केवारी ८७.९१ अशी आहे. २०१५ मध्ये मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.३१ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.२६ अशी होती.प्रावीण्य श्रेणीतील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ! जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा निकालाच्या टक्केवारीत समाधानकारक वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे यंदा जिल्ह्यात गुणवंत विद्यार्थ्यांच्या संख्येतदेखील वाढ झाली असल्याचे दिसून येते. गतवर्षी जिल्ह्यात प्राविण्य श्रेणीत ५९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा प्राविण्य श्रेणीत तब्बल ११३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी प्रथमश्रेणीत ५२७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा ८९४९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी द्वितीय श्रेणीत ५२४४ तर उत्तीर्ण श्रेणीत २१४ विद्यार्थी उर्त्तीर्ण झाले होते. यावर्षी द्वितीय श्रेणीत ५९२१ विद्यार्थी तर उत्तीर्ण श्रेणीत १९० विद्यार्थी आहेत.