शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"भाजपने डॉग स्कॉड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
8
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
9
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
10
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
11
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
12
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
13
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
14
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
15
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
16
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
17
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
18
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
19
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
20
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."

Washim Unlock : कठोर निर्बंध शिथिल होताच बाजारपेठ फुलली; व्यापारीही सुखावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 11:40 AM

Washim Unlock: वाशिम शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ १ जून रोजी गर्दीने फुलली असून, व्यापाऱ्यांसह नागरिकही सुखावल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : निर्बंध शिथिल होताच, दीड महिन्यानंतर वाशिम शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ १ जून रोजी गर्दीने फुलली असून, व्यापाऱ्यांसह नागरिकही सुखावल्याचे दिसून आले. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अजून टळलेला नसल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक ठरत आहे.दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित झाले. मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा निर्बंध कठोर करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ एप्रिल २०२१ रोजी राज्यातील जनतेला संबोधित करताना, १३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून निर्बंध कठोर करण्याचा निर्णय जाहीर केला आणि प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावीणदेखील सुरू केली. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता उर्वरित दुकाने बंद झाल्याने बाजारपेठही ओस पडू लागली. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे पाहून जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी ९ मेपासून निर्बंध आणखी कडक केले. यामध्ये टप्प्याटप्प्याने सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवेतील काही दुकानांना मुभा मिळत गेली. मात्र, अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्य दुकाने बंदच ठेवण्यात आली. कडक निर्बंधांचे चांगले परिणाम दिसून आले असून, कोरोनाचा आलेख खाली आला. पॉझिटिव्हिटी रेटही ५ टक्क्यांपर्यंत नीचांकी आला. यामुळे १ जूनपासून पुढील सात दिवसांसाठी निर्बंध शिथिल झाले असून, यानुसार जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सर्व दुकाने सकाळी ७ ते  दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा मिळाली. यामुळे गत दीड महिन्यापासून ओस पडलेली बाजारपेठ पहिल्याच दिवशी १ जून रोजी ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्याचे दिसून आले. वाशिम शहरातील पाटणी चौकस्थित बाजारपेठेत विविध वस्तू व साहित्य खरेदीसाठी नागरिकांची एकच गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झाले नसल्याचे पाहावयास मिळाले. कोरोनाचा आलेख खाली आला असला तरी धोका अजून संपलेला नसल्याने नागरिकांनी यापुढेही कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांकडून ताडपत्री, शेतीविषयक साहित्याची खरेदीकडक निर्बंध लागू असल्याने कारवाईच्या भीतीपोटी ग्रामीण भागातील नागरिक शक्यतोवर शहरी भागातील बाजारपेठेत येणे टाळत होते. निर्बंध शिथिल झाल्याने पहिल्याच दिवशी ग्रामीण भागातील नागरिकांनी प्लास्टिक कापड, ताडपत्री यांसह शेतीविषयक वस्तू, साहित्याची खरेदी करण्यासाठी शहरी भागातील बाजारपेठ गाठल्याचे दिसून आले. पावसाळा तोंडावर असल्याने घराची डागडुजी म्हणून टीनपत्रे, प्लास्टिक कापड, ताडपत्री आदींची खरेदी होत असल्याचे दिसून येते.

भाजीपाला खरेदीसाठीही गर्दी ! पाटणी चौकस्थित भाजीपाला बाजार हा विखुरलेल्या ठिकाणी अन्यत्र भरविण्यात येतो. सुंदरवाटिका, लाखाळा परिसर, सिव्हिल लाइन रोड, जुनी आययूडीपी रोड यांसह अन्य भागांत भाजीपाला विकला जात असून, सुंदरवाटिका रोडस्थित भाजीपाला बाजारात नागरिकांची एकच गर्दी होत असल्याचे दिसून येते. या गर्दीतून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव तर वाढणार नाही ना? याची दक्षताही कुणाकडून घेतली जात नाही.

प्रत्येक जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यकनिर्बंध शिथिल झाले असले तरी कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास हातभार लागणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घेणे आवश्यक ठरत आहे. जीवनावश्यक व अन्य वस्तू, साहित्याची खरेदी करणे आवश्यकच आहे. परंतु, बेजबाबदार वागणुकीतून कोरोना संसर्ग तर वाढणार नाही ना? याचे भान ठेवणेही गरजेचे आहे.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक