लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - शासनाची कोणतीही परवानगी न घेता चोरट्या मार्गाने रेती, मुरूम, गिट्टी आदी गौण खनिजाची वाहतूक करणा-यांवर वॉच ठेवण्यासाठी तहसिल स्तरावर विशेष पथकांचे गठण करण्यात आले आहे.गौण खनिजाचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यापूर्वी शासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकजण शासनाची परवानगी न घेता चोरट्या मार्गावर बिनधास्त गौण खनिजाची वाहतुक करीत असल्याचे वास्तव आहे. चोरट्या वाहतुकीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. गौण खनिजाच्या चोरट्या मार्गाने होणाºया वाहतुकीला आळा घालणे आणि शासनाच्या महसुलात वाढ करणे या उद्देशाने तहसिल स्तरावर विशेष पथक गठीत करण्यात आले आहे. या पथकात मंडळ अधिकारी, तलाठ्यांचा समावेश असून, वेळप्रसंगी पोलीस प्रशासनाचे सहकार्य घेतले जाणार आहे. सायंकाळी व पहाटेदरम्यान नाकाबंदी करून चोरट्या मार्गाने होणाºया वाहतूकप्रकरणी कारवाई केली जाणार आहे, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.जिल्ह्यात काही प्रमाणात निसर्गसंपदा असल्याने गौणखनिज साठा उपलब्ध आहे. त्यात वाळू, मुरुम, माती यांचा समावेश आहे. अद्यापपर्यंत वाळू लिलावांना हिरवा कंदील मिळाला नसल्याने वाळू लिलाव होऊ शकले नाहीत. चोरट्या मार्गाने वाळूची वाहतुक केली जाते. विशेषत: रेती चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे केला जाणार आहे. अलिकडच्या काळातील महसूल अधिकाºयांवरील हल्ल्यांच्या घटनांमुळे विशेष पथकातील सदस्य सायंकाळी व पहाटेदरम्यान गौण खनिज चोरट्यांविरूद्ध कारवाईची मोहिम कशी राबवितात, याकडे लक्ष लागून आहे. कारवाईदरम्यान पोलीस संरक्षण नसल्याने आणि पथकांवर हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पथकातील सदस्यांमध्येही भितीचे वातावरण असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे.
वाशिम : गौण खनिज चोरट्यांवर तहसिलच्या पथकांचा ‘वॉच’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 8:51 PM
वाशिम - शासनाची कोणतीही परवानगी न घेता चोरट्या मार्गाने रेती, मुरूम, गिट्टी आदी गौण खनिजाची वाहतूक करणाºयांवर वॉच ठेवण्यासाठी तहसिल स्तरावर विशेष पथकांचे गठण करण्यात आले आहे.
ठळक मुद्देपोलीस संरक्षणही घेणार महसूल वाढविण्याचा प्रयत्न