वाशिम: आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काॅंग्रेसकडून चाचपणी सुरू झाली असून, १३ ऑगस्ट रोजी स्थानिक विश्रामगृहात यवतमाळ-वाशिमलोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक तथा माजी मंत्री आमदार सुनील केदार यांनी आढावा बैठकीतून पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली.
बैठकीला काॅंग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक, आमदार धीरज लिंगाडे, ज्येष्ठ नेते जीवन पाटील, जिल्हा निरीक्षक तातूभाऊ देशमुख, प्रदेश महासचिव ॲड. दिलीपराव सरनाईक, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, जि.प. उपाध्यक्ष चक्रधर गोटे, सभापती वैभव सरनाईक, माजी जि.प. अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, माजी जि.प. उपाध्यक्ष डाॅ. शाम गाभणे, जिया पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वाशिम-यवतमाळ मतदारसंघाची बुथ पातळीवर बांधणी, पक्ष संघटन मजबूतीचा आढावा घेत कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. महाविकास आघाडीत वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीप्रमाणेच यावेळीही काॅंग्रेसकडेच ठेवावा, असा आग्रहदेखील कार्यकर्त्यांनी धरला.