लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम जिल्हा परिषदेत वर्ग एक दर्जाच्या अधिकाºयांची ३० आणि वर्ग दोनचे ३५ अशा एकूण ६४ अधिकाºयांची पदे रिक्त असून, सोमवारी वर्ग एकच्या चार अधिकाºयांची नियुक्ती जिल्हा परिषदेत झाली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशा चार रिक्त पदांचे ग्रहण यामुळे सुटले आहे.ग्रामीण भागाचा कारभार हाकण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची त्रिस्तरीय आखणी केली आहे. त्यात प्रत्येक यंत्रणेला महत्वाचे स्थान आहे. शासन आणि ग्रामपंचायतीत महत्वाचा दुवा म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी यासह वर्ग एकचे ३०, वर्ग दोनचे ३५ अशा एकूण ६५ अधिकाºयांची पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेत विभाग प्रमुखांची पदे रिक्त असल्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. जिल्हा परिषदेतील अधिकाºयांची रिक्त पदे भरण्याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केलेला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’नेदेखील वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. आता वर्ग एकच्या चार अधिकाºयांची नियुक्ती जिल्हा परिषदेत झाली असून, यामुळे चार विभागाला प्रमुख मिळाले आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून लीना बनसोड यांची नियुक्ती झाली आहे. एस.एस. पाटील यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) म्हणून नियुक्ती झाली आहे. यापूर्वी त्या पंचायत समिती मुळशी जि. पुणे येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. डॉ. विनोद नारायणराव वानखेडे हे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी म्हणून पदोन्नतीने ५ आॅगस्ट रोजी रूजू झाले आहेत. यापूर्वी ते पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पं.स. अमरावती येथे कार्यरत होते. एस.एम. मठपती यांची वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ते ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर येथे व्याख्याता म्हणून कार्यरत होते.
वाशिम जिल्हा परिषदेला मिळाले चार अधिकारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 3:14 PM