लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या १५ पैकी तब्बल सात विभाग प्रमुखांची पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजाचा वेग मंदावत असल्याचे दिसून येते. रिक्त पदे भरण्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतरही अद्याप रिक्त पदांचे ग्रहण सुटले नाही. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाºया जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागाचा विकास साधला जातो. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या माध्यमातून योजनांची अंमलबजावणी केली जाते. अलिकडच्या काळात शासनाकडून जिल्हा परिषदेचे महत्व कमी केले जात असल्याचे दिसून येते. योजना राबविणारी एजन्सी म्हणूनच याकडे पाहिले जात आहे. शासनाकडून मिळणाºया निधीतही कपात होत आहे तर दुसरीकडे नवनवीन उपक्रम, योजनांच्या अंमलबजावणीची भर पडत आहे. अंमलबजावणीसाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नसल्याने तसेच महत्त्वाची पदे रिक्त असल्याने जिल्हा परिषदेचा प्रशासकीय डोलारा सांभाळण्याची कसरत मुख्य कार्यकारी अधिकाºयांना करावी लागत आहे.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला सन २०१४ पासून कायमस्वरुपी प्रकल्प संचालक नाहीत. सदर पद रिक्त असल्याने प्रभारींच्या खांद्यावर या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संजय कापडनीस यांची बदली झाल्यापासून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांचे पद रिक्त आहे. या पदाचा प्रभार कारंजाच्या गटविकास अधिकाºयांकडे सोपविण्यात आला आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रमोद कापडे सेवानिवृत्त झाल्यापासून सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्तच आहे. बांधकाम, लघुसिंचन व ग्रामीण पाणीपुरवठा अशा तिन्ही विभागाचे कार्यकारी अभियंता पद रिक्त आहे. या पदांचा प्रभार अन्य अभियंत्यांकडे सोपविला आहे. कृषी विकास अधिकारी, चार बालविकास प्रकल्प अधिकारी, तीन तालुका आरोग्य अधिकारी, दोन पशूधन विकास अधिकारी, ११ पेक्षा अधिक वैद्यकीय अधिकारी, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) तीन, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) तीन पदे, आदी प्रमुख अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजाला गती देताना नाकीनऊ येत आहे. वर्ग एक व दोनच्या अधिकाºयांची पदे भरण्याची मागणी जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे वारंवार केली आहे. मात्र, ही बाब शासनाने अद्याप गांभीर्याने घेतली नसल्याचे दिसून येते. या आठ विभागांना आहेत नियमित प्रमुख जिल्हा परिषदेच्या आठ विभागांना नियमित विभाग प्रमुख आहेत. यामध्ये पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण विभाग, आरोग्य, पंचायत, जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग अशा आठ विभागांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. - दीपक कुमार मीनामुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम
वाशिम जिल्हा परिषद : १५ पैकी ७ विभाग प्रमुखांची पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 1:52 PM