शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Washim ZP : मिनी मंत्रालयात महाविकास आघाडीचीच सत्ता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 3:20 PM

आघाडीचीच सत्ता स्थापन होणार असल्याचे आघाडीतील काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले.

- नंदकिशोर नारे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदमध्ये आघाडीला स्पष्ट बहुमत असतांना काही पक्षांकडून सत्ता स्थापनेच्या गप्पा केल्या जात आहेत. हा राजकीय वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न असून त्या केवळ वावडया आहेत. आघाडीचीच सत्ता स्थापन होणार असल्याचे आघाडीतील काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले. या संदर्भात महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक ही घेण्यात आल्याची माहिती आहे.जिल्हा परिषदेच्या निवडणुक निकालानंतर आता सत्तास्थानेच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. तथापि, महाविकास आघाडी करून राज्यात सत्तास्थापन करणाऱ्या काँग्रेस, रा.काँ. आणि शिवसेनेकडे जिल्हा परिषदेत सत्तास्थापन करण्यासाठी २७ हे संख्याबळ आहे; मात्र जिल्हा परिषदेच्या राजकारणात े माजी खासदार अनंतराव देशमुख हे आपल्या जनविकास आघाडीच्या ७ सदस्यांना सोबत घेऊन रा.काँ. (१२) आणि भारिप-बमसंच्या (८) साथीने सत्तास्थापन करणार असल्याच्या वावळया उडविल्या जात आहेत. यासंदर्भात अनंतराव देशमुख यांच्याशी चर्चा केला असताना त्यांनी सूध्दा सत्ता ही आघाडीची बनविल्या जाणार यात शंका नाही, परंतु यासंदर्भात आपल्याला कोणाकडूनही विचारणा झालेली नाही. सत्ता स्थापनेबाबत विचारणा केल्यास आपण उत्सूक नक्कीच असल्याचे सांगितले होते. तरी काही विरोधकांकडून मात्र काँग्रेसला बाजुला ठेवून सत्ता स्थापन के ल्या जाणार असल्याच्या वावडया उडविल्या जात आहे. यामध्ये काहीच तथ्य नसल्याचे आघाडीतील नेते, जिल्हाध्यक्षांचे म्हणणे आहे. तसेच आघाडीतील तीनही पक्षांच्या नेत्यांनी महाविकास आघाडीतीलच उमेदवाराला अध्यक्ष व उपाध्यक्ष पद देण्यात येणार असल्याचे सांगितले. याबाबत खा. भावना गवळी, आ. अमित झनक, प्रकाश डहाके, चंद्रकांत ठाकरे, अ‍ॅड. दिलीप सरनाईक यांच्या चर्चेवरुन महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होण्याचे चिन्हे आहेत.भाजपाची गोची जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने ७ जागेवर विजय मिळविला असून महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत असल्याने सत्ता स्थापनेचा विचार सुध्दा भाजपाच्या नेत्यांना करता येत नसल्याने त्यांची चांगलीच गोची झाली आहे. विशेष म्हणजे सत्ता स्थापनेबाबत उडत असलेल्या वावळयांमध्येही भाजपाचे कुठेच नाव सुध्दा निघत नसल्याने भाजप तटस्थ दिसून येत आहे. अपक्षांनाही कोणी विचारत नसल्याचे चित्र आहे.जिल्हा परिषद निवडणूका जरी स्वतंत्र लढविण्यात आल्या असल्यातरी जनतेने आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिल्याने सत्ता आघाडीची स्थापन होणार आहे. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नसून लवकरच यावर चर्चा करुन सर्वांच्या समन्वयातून आघाडीची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये दिसून येईल. काही जण विणाकारण वावळया उडवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु त्याला अपयश येणे नव्हे!-भावनाताई गवळी,खासदार, शिवसेनाराज्यात आघाडीची स्थापना आहे. जिल्हा परिषदेमध्ये मतदारांनी काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देऊन बहुमतावर पोहचविले, त्यामुळे सत्ता आघाडीचच राहिल यात शंका नाही.-अ‍ॅड. दिलीपराव सरनाईक, काँग्रेस जिल्हाध्यक्षराज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. जिल्हा परिषदेमध्येही महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेकडे सत्तास्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले २७ चे संख्याबळ आहे. त्यामुळे दुसरे कोणी सत्ता स्थापन करण्याचा दावा करणे म्हणजे स्वत:चा हसा करुन घेणे होय. आम्ही आघाडीतील तीनही पक्ष समन्वय साधून आघाडीचीच सत्ता स्थापन करणार आहोत.- चंद्रकांत ठाकरेजिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद