नंदकिशोर नारे / वाशिम: राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत गरजू रुग्णांना दृष्टी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या कार्यात जिल्हय़ात २00८ ते आजपर्यंत ५0७ नेत्रबुबुळे जमा करून दृष्टिहीनांना दृष्टी देण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणेमार्फत राबविण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचे एनजीओ नसताना शासकीय यंत्रणेने जिल्हय़ात नेत्रदान चळवळीस दिलेले योगदान मोलाचे आहे. जिल्हा शासकीय यंत्रणेमार्फत राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त रुग्णांना लाभ मिळावा याकरिता शिबिरे, कांचबिंदू , मोतीबिंदू निदान व उपचार शिबिरे राबवून कार्यक्रमास गती दिली. १९९८ आधी अकोला जिल्हा असल्याने सदर कार्यक्रम अकोला येथून राबविल्या जायचा. २00३ पासून स्वतंत्र कारभार वाशिम सुरू झाला. या अंतर्गत प्रचार व प्रसार करून या मोहिमेला चांगली गती दिली. मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत ह्यएचओटीएह्ण परवानगी घेऊन नेत्रबुबुळे संकलन केंद्र वाशिम येथे २00८-0९ मध्ये स्थापन करण्यात आले. केंद्र स्थापन केल्यानंतर सर्वप्रथम नेत्रदान करण्याचा मान ३0 सप्टेंबर २00८ रोजी स्व. कलावती घनश्याम अग्रवाल यांना मिळून केंद्रास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीच्या वर्षीच म्हणजे २00८-0९ मध्ये एकूण २२ नेत्रबुबुळे जमा करण्यात आले. २00९-१0 मध्ये ६४, २0१0-११ मध्ये १0८, २0११-१२ मध्ये ६६, २0१२-१३ मध्ये ६८, २0१३-१४ मध्ये ६७ व २0१४ -१५ मध्ये ८२ व २0१५ आतापर्यंत ३0 असे एकूण ५0७ नेत्रबुबुळे जमा केले. जिल्हय़ात नेत्रदान चळवळीला गतिमान करण्यासाठी नियंत्रक समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी, कार्यकारी समिती अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शल्य चिकित्सक व त्यांची टीम प्रयत्नशील आहे. वाशिम जिल्हय़ात नेत्रदानाचे काम पूर्णत: शासकीय यंत्रणेमार्फतच राबविण्यात येते.
नेत्रदानात वाशिमकरांचे मोलाचे योगदान
By admin | Published: August 29, 2015 1:07 AM