वाशिम - वाशिम येथे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सुसज्ज असे कार्यालय लवकरच कार्यान्वित होणार आहे. या कार्यालय परिसरात वाहन चाचणी मैदानासह सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे. वाशिमच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला स्वतंत्र इमारत नसल्याने सध्या भाडेतत्वावरील इमारतीतून कामकाज सुरू आहे. येथे वाहन ‘फिटनेस’ प्रमाणपत्र तपासणीसाठी ‘टेस्ट ट्रॅक’ नाही तसेच अन्य कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. साधारणत: दीड वर्षांपूर्वी स्वतंत्र कार्यालयासाठी निधी मंजूर झाल्याने बांधकामाला सुरूवात झाली होती. आता बांधकाम अंतिम टप्प्यात असून, येथे ‘अत्यानुधिक वाहन टेस्टिंग ट्रॅक’ही होणार आहे. तसेच परवान्यासाठी गाड्यांच्या चाचण्या घेण्यासाठी सुसज्ज मैदानाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय टळणार आहे.
वाशिमचे आरटीओ कार्यालय होणार हायटेक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 2:53 PM
वाशिम - वाशिम येथे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सुसज्ज असे कार्यालय लवकरच कार्यान्वित होणार आहे.
ठळक मुद्देदीड वर्षांपूर्वी स्वतंत्र कार्यालयासाठी निधी मंजूर झाल्याने बांधकामाला सुरूवात झाली होती. परवान्यासाठी गाड्यांच्या चाचण्या घेण्यासाठी सुसज्ज मैदानाची सुविधा उपलब्ध होणार आहे.