- नंदकिशाेर नारे
वाशिम : काेराेना संसर्ग कमी झाला असला तरी खबरदारी म्हणून अजूनही काही दिवस मास्कचा वापर करावाचं लागणार आहे. शाळा, महाविदयालये सुरु हाेण्याच चिन्हे दिसून येत आहे. मास्क लावून शिक्षकांना शिकवितांना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागेल. जाेराने बाेलावे लागणार आहे. याकरिता वाशिम येथील सत्यनारायणाने एक मिनी मेगाफाेन तयार केला असून शिक्षकांना ताे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी उपयाेगी ठरणार आहे.
वाशिम येथील शासकीय तंत्र निकेतनचे सेवानिवृत्त चार्जमन तथा विद्युत अभियंता आणि पारंपारिक उर्जा निमिर्ती क्षेत्रामधील संशाेधक म्हणून भारत सरकारने प्रमाणित केलेले सत्यनारायण भड यांनी एक नाविन्यपूर्ण इलेक्ट्रोनिक उपकरण ”मिनी मेगाफोन” तयार केले आहे. सध्याच्या जागतिक , कोरोना महामारीमध्ये सर्वच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षकांना मास्क लावूनच शिकवावे लागेल. गेल्या दीड दोन वर्षापासूनच्या या महामारीतील वातावरणामुळे प्रत्येकाची प्रतिकार शक्ती निश्चितच कमी झालेली आहे. तसेच घसा आणि स्वरयंत्रावर सुद्धा त्याचा परिणाम दिसून येतो आहे. यातच जर शिक्षकाने मास्क लावून शिकवितांना मोठ्या आवाजात शिकविले तर घश्यावर आणखी ताण वाढेल आणि महत्वाचे म्हणजे मास्कमधून शिकवितांना मागच्या विध्यार्थ्यांपर्यंत स्पष्ट आवाज पोहोचू शकत नाही, जेणेकरून विद्यार्थ्यांचे पुन्हा शैक्षणिक नुकसान होऊ शकते. या संपूर्ण गोष्टींचा विचार करून भड यांनी “मिनी मेगाफोन” तयार केला आहे.हा मेगाफोन आकाराने अगदीच लहान असून त्याला जोडलेल्या बेल्टचा उपयोग करून गळ्यात लटकविता येतो आणि मास्कच्या बाहेरून त्याचा मायक्रोफोन लावता येतो. अगदी कमी आवाजात बोलले तरी मेगाफोनाच्या स्पीकरमधून मोठ्याने आणि स्पष्टपणे विद्यार्थ्यांना ऐकायला येते. व्हाल्युम कंट्रोल सेट करून पाहिजे तेवढा आवाज ऐकता येतो. याचे वजन खूप कमी आहे. मिनी मेगाफाेनची वैशिष्टे
पाॅवर : १ वॅटपाॅवर साेर्स : ९ व्हाेल्ट, रिचार्जेबल बॅटरीलांबी : ४.५, रुंदी २.५, उंची ४.५वजन : २०० ग्रॅममायक्राेफाेनबॅटरी बॅकअप : ५० तास