शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
2
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
रुपाली भोसलेने Bigg Boss मधील 'या' स्पर्धकाची केली कानउघाडणी; म्हणाली, "का हा ॲटिट्युड?"
6
कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- "मी अमेरिकन असती तर..."
7
Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
8
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
9
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
10
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
11
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
12
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
13
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
14
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
15
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
16
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
17
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
18
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
19
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
20
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!

वाशिमच्या ‘सत्यनारायण’ने तयार केला ‘मिनी मेगाफाेन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:27 AM

नंदकिशाेर नारे वाशिम : काेराेना संसर्ग कमी झाला असला, तरी खबरदारी म्हणून अजूनही काही दिवस मास्कचा ...

नंदकिशाेर नारे

वाशिम : काेराेना संसर्ग कमी झाला असला, तरी खबरदारी म्हणून अजूनही काही दिवस मास्कचा वापर करावाच लागणार आहे. शाळा, महाविद्यालये सुरू हाेण्याच चिन्हे दिसून येत आहे. मास्क लावून शिक्षकांना शिकविताना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागेल. जाेराने बाेलावे लागणार आहे. याकरिता वाशिम येथील सत्यनारायणाने एक मिनी मेगाफाेन तयार केला असून, शिक्षकांना ताे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी उपयाेगी ठरणार आहे.

वाशिम येथील शासकीय तंत्रनिकेतनचे सेवानिवृत्त चार्जमन तथा विद्युत अभियंता आणि पारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षेत्रामधील संशाेधक म्हणून भारत सरकारने प्रमाणित केलेले सत्यनारायण भड यांनी एक नावीन्यपूर्ण इलेक्ट्रॉनिक उपकरण ‘मिनी मेगाफोन’ तयार केले आहे. सध्याच्या जागतिक, कोरोना महामारीमध्ये सर्वच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षकांना मास्क लावूनच शिकवावे लागेल. गेल्या दीड-दोन वर्षांपासूनच्या या महामारीतील वातावरणामुळे प्रत्येकाची प्रतिकार शक्ती निश्चितच कमी झालेली आहे, तसेच घसा आणि स्वरयंत्रावरही त्याचा परिणाम दिसून येतो आहे. यातच जर शिक्षकाने मास्क लावून शिकवितांना मोठ्या आवाजात शिकविले, तर घशावर आणखी ताण वाढेल आणि महत्त्वाचे म्हणजे मास्कमधून शिकविताना मागच्या विद्यार्थ्यांपर्यंत स्पष्ट आवाज पोहोचू शकत नाही, जेणेकरून विद्यार्थ्यांचे पुन्हा शैक्षणिक नुकसान होऊ शकते. या संपूर्ण गोष्टींचा विचार करून भड यांनी ‘मिनी मेगाफोन’ तयार केला आहे. हा मेगाफोन आकाराने अगदीच लहान असून, त्याला जोडलेल्या बेल्टचा उपयोग करून गळ्यात लटकविता येतो आणि मास्कच्या बाहेरून त्याचा मायक्रोफोन लावता येतो. अगदी कमी आवाजात बोलले, तरी मेगाफोनाच्या स्पीकरमधून मोठ्याने आणि स्पष्टपणे विद्यार्थ्यांना ऐकायला येते. व्हॉल्युम कंट्रोल सेट करून, पाहिजे तेवढा आवाज ऐकता येतो. याचे वजन खूप कमी आहे.

-----------------

मिनी मेगाफाेनची वैशिष्ट्ये

पाॅवर : १ वॅट

पाॅवर साेर्स : ९ व्हाेल्ट, रिचार्जेबल बॅटरी

लांबी : ४.५, रुंदी २.५, उंची ४.५

वजन : २०० ग्रॅम

मायक्राेफाेन

बॅटरी बॅकअप : ५० तास

-----------------

काेराेना संसर्ग पाहता व काही दिवसानंतर शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांना शिकविताना मास्क लावावे लागणार आहेत. त्यामुळे शिक्षकाचा आवाज शेवटच्या मुलापर्यंत पाेहोचणे शक्य नाही. याकरिता ही कल्पना सुचली व ‘मिनी मेगाफाेन’ नावाचे हे यंत्र बनविले, जे शिक्षकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.

- सत्यनारायण भड, पारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षेत्रामधील संशाेधक