शिरपूर नजीकच्या आडोळ प्रकल्पातून रिसोड शहराला पाणीपुरवठा केला जातो. आडोळ प्रकल्पातून रिसोड शहराकडे गेलेल्या जलवाहिनीच्या व्हाॅल्वमधून ढोरखेडा ते पारडीदरम्यान पाणी गळती होत आहे. या जलवाहिनीच्या व्हाॅल्वमधून मिनिटाला शेकडो लिटर तर दिवसाला हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे रिसोड नगर परिषदसह लघु पाटबंधारे विभागाच्या आडोळ प्रकल्पाचा अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. आडोळ प्रकल्पातून रिसोड, शिरपूर, रिठदसारख्या मोठ्या गावांनासुद्धा पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा जलवाहिनीच्या व्हाॅल्वमधून होणारा पाण्याचा अपव्यय वेळीच थांबविणे गरजेचे आहे.
आडोळ प्रकल्पातून रिसोड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू आहे. ही पाणी गळती त्वरित थांबवावी.
विक्रम शिंदे. ग्रामस्थ खंडाळा शिंदे.