शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांचेही सहकार्य आवश्यक असून, कचरा संकलनासाठी घंटागाड्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कचरा संकलन व्यवस्थित होत आहे की नाही, प्रत्येक प्रभागात घंटागाडी जाते की नाही याची पडताळणी म्हणून नगरपरिषदेने सोशल मीडियाचा आधार घेत ग्रुप बनविला आहे. यामध्ये घंटागाडीचे चालक, वाहक, नगराध्यक्ष विजयमाला आसनकर, मुख्याधिकारी गणेश पांडे, यांच्यासह आरोग्य अधिकारी, घंटागाडीवर वॉच करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. त्यामुळे शहरात कोणत्या गल्लीमध्ये घंटागाडी किती वाजता गेली, कोणत्या गल्लीतील कचरा उचलून नेला किंवा नाही याचीही पाहणी या ग्रुपद्वारे होत आहे. गल्लीत घंटागाडी गेली किंवा नाही हे निदर्शनात येत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर वाॅच राहत आहे. कुठल्या गल्लीत घंटागाडी आहे, त्याचे छायाचित्र अपलोड करून वेळेनुसार ग्रुपमध्ये टाकावे लागत आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून घंटागाड्यांवर वाॅच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:36 AM