शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

वृक्षारोपणाच्या खड्ड्यांवर पथकाचा ‘वॉच’!

By admin | Published: May 19, 2017 1:03 AM

वाशिम जिल्हा परिषद : ३.८६ लाखांचे उद्दिष्ट, ९४ हजार खड्डे खोदले

संतोष वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गंत तीन लाख ८६ हजाराच्या वर वृक्षारोपण केले जाणार आहे. वृक्षारोपणासाठी संबंधित विभागाने खड्डे खोदले किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी जिल्हा परिषदेने पथक गठित केले आहे. ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत वृक्ष लागवड केली जाणार आहे. वाशिम जिल्ह्याला ५ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, यापैकी तीन लाख ८६ हजार वृक्ष लागवड जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत केली जाणार आहे. पंचायत विभागातर्फे प्रत्येक ग्रामपंचायतीला ७५० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. १ ते ७ जुलै दरम्यान वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे आतापासूनच वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी केल्या आहेत. १७ मे पर्यंत एकूण ९४ हजार ३५० खड्डे खोदण्यात आले. देखभाल दुरूस्ती व संरक्षणासाठी ग्रामपंचायतीच्या ताब्यात असणाऱ्या ई-क्लास जमिनीवरही वृक्ष लागवड केली जाणार आहे. वृक्षारोपणासाठी संबंधित यंत्रणेने खड्डे खोदले किंवा नाही, यावर देखरेख म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कक्षाचे गटविकास अधिकारी रुपेश निमके यांच्या नेतृत्वाखाली एक पथक गठीत केले आहे. सदर पथक ग्रामपंचायतींना अचानक भेटी देऊन पाहणी करणार आहे.