लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पात सध्या १०० टक्के जलसाठा असल्यामुळे सिंचनाच्या अपेक्षा उंचाविल्या आहेत. मात्र, दुसरीकडे पुरेशा प्रमाणात वीजपुरवठा नसल्याने ४०० हेक्टरवरील सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.यावर्षी मालेगाव तालुक्यात बºयापैकी पाऊस पडला. त्यामुळे सिंचन प्रकल्पात समाधानकारक जलसाठा आहे. शिरपूरपासून नजीक असलेला अडोळ सिंचन प्रकल्प तर १०० टक्के तुडुंब भरला आहे. त्यामुळे वाघी, खंडाळा, ढोरखेडा, बोराळा, शेलगाव यासह इतर गावच्या शेतकºयांना रब्बी हंगामात सिंचन करता येईल, अशा आशा पल्लवित झाल्या आहेत. १०० टक्के जलसाठा उपलब्ध असला तरी सिंचनासाठी लागणारी वीज या परिसरातील शेतकºयांना आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. शिरपूर येथे उभारणी केलेल्या ३३ केव्ही उपकेंद्रातील ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर मागील महिन्यात कामरगाव येथील वीज उपकेंद्रात स्थलांतरीत केल्याने शिरपूर परिसरातील वीजपुरवठा अनियमित झाला. वीजपुरवठ्याची समस्या अद्याप निकाली निघाली नसल्याने सिंचनात व्यत्यय निर्माण झाला आहे. अडोळ प्रकल्पात १०० टक्के जलसाठा असतानाही वीजपुरवठ्याअभावी सिंचन करता येत नसल्याची आपबिती वाघी, खंडाळा, ढोरखेडा, बोराळा, शेलगाव यासह इतर गावच्या शेतकºयांनी कथन केली. शिरपूर परिसरातील वीजसमस्या निकाली काढावी, अशी मागणी शेतकºयांनी बुधवारी केली.
अडोळ प्रकल्प तुडूंब; पण सिंचनासाठी वीजच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 2:17 PM