- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : साठवण तलावांचे पाझर तलावात रुपांतर, सिंचनासाठी पाईप व्यवस्था, लघु प्रकल्पांची देखभाल दुरूस्ती, साठवण बंधाऱ्यांची निर्मिती आदींसाठी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने २०२०- २१ मध्ये जिल्हा नियोजन विभागाकडे अतिरिक्त ३१५ कोटींच्या निधीची मागणी नोंदविली होती. यापैकी केवळ ३५ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाल्याने देखभाल दुरूस्तीची कामे कशी करावी? असा पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.ग्रामीण भागात सिंचनाची सुविधा निर्माण करणे, जलपातळीत वाढ करणे आदींसाठी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागातर्फे लघु प्रकल्प, पाझर तलाव, साठवण तलाव, कालवे दुरूस्तीची कामे केली जातात. लघु प्रकल्प, साठवण व पाझर तलाव, कालवे आदींची आयुर्मर्यादा साधारणत: ४० ते ४५ वर्षे असते. बहुतांश प्रकल्पांची आयुर्मर्यादा संपत येत असल्याने देखभाल दुरूस्ती होणे गरजेचे ठरत आहे. मात्र, पुरेसा निधी नसल्याने देखभाल दुरूस्ती कशी करावी? हा पेच आहे. नवीन साठवण तलाव, जुन्या साठवण तलावाचे पाझर तलावात रुपांतर, प्रवाही सिंचन योजनेंतर्गतचे अनेक कालवे नादुरूस्त असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून पाईपलाईन टाकणे, आयुर्मर्यादा संपत आलेल्या प्रकल्पांची देखभाल दुरूस्ती आदींसाठी जलसंधारण विभागाला जवळपास ३१५ कोटींच्या अतिरिक्त निधीची गरज आहे. जिल्हा वार्षिक योजनेमधून हा निधी मिळावा, याकरिता जलसंधारण विभागाने गतवर्षी जिल्हा नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. यापैकी केवळ ३५ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. निधी मात्र अद्याप मिळाला नाही. निधीअभावी प्रकल्पांच्या देखभाल, दुरूस्तीची कामे प्रभावित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जलसंधारण विभागाला हवे अतिरिक्त ३१५ कोटी; मंजूर केवळ ३५ कोटी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 11:21 AM