लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य शासन व भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करण्यासाठी सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गंत जलसंधारणाची कामे करुन गाव पाणीदार करण्यासाठी चढाओढ सुरु झाली आहे. जिल्ह्यातील १४ गावात १३ जेसीबी मशीनच्या आधारे शेततळे, नाला खोलीकरण, नदी खोलीकरण आदी कामे वेगात करण्यात येत आहेत.पाणीटंचाईची समस्या कायम हद्दपार करण्यासाठी भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) पुढाकार घेतला आहे. यानुसार बीजेएस आणि राज्यशासनादरम्यान झालेल्या सामंजस्य करारानुसार राज्यात सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात १८ गावांची जलसंधारणाच्या कामांसाठी प्राथमिक टप्प्यात निवड झाली असून, या गावांत प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली आहे. कृषी विभाग, वनविभाग, पाटबंधारे विभाग, महसूल विभाग आणि भूजल सर्वेक्षण व विकास संस्थेच्या सहकार्याने ही कामे करण्यात येत आहेत. यात १०० चौरस मीटर लांबी, रुंदी आणि ३ ते ४ मीटर खोल आकाराच्या भव्य शेततळ्यांसह नदी खोलीकरण, नाला खोलीकरण, तलावातील गाळ उपसा, खोल सलग समतल चर, तसेच इतर काही कामांचा समावेश आहे. तालुकास्तरावर तहसीलदार आणि इतर संबंधित अधिकाºयांच्यावतीने या कामांचा वारंवार आढावा घेण्यात येत आहे. सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात बीजेएसने उपलब्ध केलेल्या २८ जेसीबी मशीनपैकी १३ मशीनच्या आधारे १४ गावांत वेगाने कामे करण्यात येत आहेत.वाशिम तालुका आघाडीवरसुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात पाच तालुक्यांत कामांना वेग आला असला तरी, सद्यस्थितीत वाशिम तालुका आघाडीवर असून, या तालुक्यातील धुमका, सोंडा, घोटा आणि वारला या चार गावांत कामे सुरू आहेत. त्या खालोखाल मंगरुळपीर तालुक्यात चांभई, पिंपळखुटा आणि मानोली या तीन गावांत, मानोºयात सोमनाथ नगर, पिंप्री हनुमानसह इतर एका गावांत आणि मालेगाव तालुक्यात जोडगव्हाण, चिवरा या दोन गावांत कामे सुरू आहेत.
जलसंधारणाच्या कामासाठी तालुक्यांदरम्यान चढाओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 1:26 PM