- नंदकिशोर नारे वाशिम : पाणी हे जीवन आहे, पाण्याचा वापर जपून करा अशी जनजागृती करीत लोकसहभागातून विहिर पूर्नभरण करुन एक आगळा वेगळा उपक्रम वाशिम येथील आसरा माता मंडळाच्यावतिने करण्यात आला. या जलपूर्नभरण कार्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.वाशिम शहरातील काटीवेश, सुभाष चौक परिसरात दरवर्षी जाणवत असलेली पाणी टंचाई लक्षात घेता सदर उपक्रम याच भागातील रविवासी तथा उपमुख्याध्यापक सुरेश विष्णुपंत खरावण यांनी जलपूर्नभरणाचा विचार काही वर्षांआधी परिसरातील नागरिकांसमोर मांडला. त्याला नागरिकांनी होकार दिला. त्यानंतर लोकसहभागातून झालेल्या कामामुळे दरवर्षी जाणवणारी पाणी टंचाई दूर झाल्याने दरवर्षी विहिर पूनर्भरण कार्यक्रम स्वयंस्फुर्तीन नागरिक एकत्र येवून करताहेत. त्याचा फायदा या परिसरातील नागरिकांना असा झाला की, दरवर्षी वाशिम शहरामध्ये सर्वत्र पाणी टंचाई जाणवत असतांना या भागात मात्र पाण्याची मोठया प्रमाणात रेलचेल असते. जलसंकटावर मात करण्यासाठी खरावण यांच्या पुढाकाराने व परिसरातील नागरिकांच्या सहायाने केलेल्या विहिर पूनर्भरण ठिकाणी घराच्या छतावरील पाणी सोडले तर याचा फायदा होईल म्हणून २५ बाय २५ फूट टिन व १५ बाय १५ चा स्लॅब यावर पडणारे पावसाचे पाणी पाईपव्दारे गाळून विहिरीत सोडावे असा विचार आला. परंतु हे करतांना विहिरीचे व घराचे अंतर ६० फूट लांब असल्याने येणारा खर्च परवडण्यासारखा नव्हता. म्हणून त्यांनी एका दोघांचे सहकार्य घेवून हा उपक्रम राबवायचा ठरविले. शेजारीच राहत असलेले राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेचे सचिव डॉ. प्रदिप फाटक, पुरुषोत्तम दुरतकर त्यांच्याकडे ही कल्पना मांडली. त्यांनी लगेच होकार दिल्याने आसरा माता मंडळाच्यावतिने अशा बॅनरखाली डॉ. प्रदिप फाटक यांच्या हस्ते नारळ फोडून रितसर उदघाटन झाले. त्याचा फायदा उन्हाळयात जाणवणाºया पाणी टंचाईतून झाला. आता दरवर्षी हा उपक्रम नित्यनेमाने राबविण्यात येत असून यामध्ये दिवसेंदिवस नागरिकांचा सहभागही वाढतोय. पावसाळा सुरु होण्याआधी दरवर्षी याचप्रकारे सतत पाईप लावणे व पावसाळा संपला की, व्यवस्थित काढण्याची जबाबदारी आजही पार पाडल्या जात आहे. यावर्षी या लोकसहभागामध्ये महिलांनी सुध्दा स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद नोंदवून या मोलाच्या कार्याला हातभार लावला. या आसरा माता मंडळाच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतूक केल्या जात आहे.
लोकसहभागातून विहिर पूनर्भरण; आसरा माता मंडळाचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 1:08 PM
वाशिम : पाणी हे जीवन आहे, पाण्याचा वापर जपून करा अशी जनजागृती करीत लोकसहभागातून विहिर पूर्नभरण करुन एक आगळा वेगळा उपक्रम वाशिम येथील आसरा माता मंडळाच्यावतिने करण्यात आला.
ठळक मुद्देउपमुख्याध्यापक सुरेश विष्णुपंत खरावण यांनी जलपूर्नभरणाचा विचार काही वर्षांआधी परिसरातील नागरिकांसमोर मांडला. दरवर्षी जाणवणारी पाणी टंचाई दूर झाल्याने दरवर्षी विहिर पूनर्भरण कार्यक्रम स्वयंस्फुर्तीन नागरिक एकत्र येवून करताहेत.