लोकमतच्या वृत्ताची दखलवाशिम : नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. पाण्याअभावी शौचालये घाणीच्या विळख्यात अडकल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उघड्यावर शौचास जावे लागते, आदींबाबत लोकमतने ७ एप्रिलच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच सुस्तावलेले आरोग्य प्रशासन जागे झाले असून रुग्णालयात ह्यवॉटर कुलरह्ण बसविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत असल्याची बाब लोकमतने वृत्ताच्या माध्यमातून उजागर केली. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.बी.पटेल यांनी रुग्णालयात ह्यवॉटर कुलरह्ण बसविण्यासंबंधी हालचाली सुरू केल्या असून येत्या २ ते ३ दिवसांत किमान ४ ह्यवॉटर कुलरह्ण रुग्णालयात लावले जातील, अशी ग्वाही त्यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.
जिल्हा सामान्य रुग्णालयात बसणार ‘वॉटर कुलर’
By admin | Published: April 07, 2017 3:04 PM