मंगरुळपीर : पाणी फाऊंडेशन व शासनाच्या सहकायार्ने गाव दुष्काळ मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पधेर्साठी यावर्षी मंगरूळपीर तालुक्याची निवड करण्यात आली. त्या दृष्टीने तालुक्यातील प्रत्येक गावाने वाटर कप स्पर्धेत सहभागी व्हावे, याकरिता मागदर्शन व आढावा घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजेश पारणाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे आयोजन २३ जानेवारी रोजी पंचायत समिती मंगरूळपीर येथील सभागृह दुपारी ३ वाजता करण्यात आले आहे. या सभेला तालुक्यातील सरपंच, कुषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांनी केले आहे. वाटर कप स्पर्धेदर्भात होणाºया बैठकीमध्ये आतापर्यंत वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फार्म नंबर २ किती गावांना तालुका समनव्यक यांच्या मार्फत वाटप करण्यात आले व ते भाग २ किती गावांनी ग्रामसभा घेऊन व प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या पाच लोकांची निवड करून भरून दिला. रोजगार हमी योजने अंतर्गत किती गावात शोषखड्याचा प्रस्ताव सादर केलेत, जलयुक्त शिवार योजनेची कामे यावर्षी कोणत्या गावात होणार आहे, वाटर कप स्पर्धेत जासीत जास्त गावांनी सहभागी होऊन होणा?्या प्रशिक्षणासाठी पाच लोकांची निवड करावी याकरिता तहसीलदार वैशाख वाहूरवाघ व तालुका कुषी अधिकारी सचिन कांबळे व तालुका समनव्यक व जलमित्र मार्गरदशन करणार आहे. तरी मंगरूळपीर तालुक्यातील सर्व सरपंच व तलाठी, कुषी सहायक, ग्रामसेवक, रोजगार सेवक यांनी उपस्थित राहवे असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले
वॉटर कप स्पर्धा : महसूल अधिकारी घेणार मंगरुळपीर तालुक्याचा आढावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 1:32 PM
मंगरुळपीर : पाणी फाऊंडेशन व शासनाच्या सहकायार्ने गाव दुष्काळ मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पधेर्साठी यावर्षी मंगरूळपीर तालुक्याची निवड करण्यात आली.
ठळक मुद्देगाव दुष्काळ मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पधेर्साठी यावर्षी मंगरूळपीर तालुक्याची निवड करण्यात आली. त्या दृष्टीने तालुक्यातील प्रत्येक गावाने वाटर कप स्पर्धेत सहभागी व्हावे, याकरिता मागदर्शन व आढावा बैठक.उपविभागीय अधिकारी राजेश पारणाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे आयोजन २३ जानेवारी रोजी पंचायत समिती मंगरूळपीर येथील सभागृह दुपारी ३ वाजता करण्यात आले आहे.