लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गतवर्षीच्या पावसाळ्यात सरासरी पर्जन्यमानात ३० ते ४५ टक्के घट झाल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवला आहे. यासंदर्भात गत महिन्यात ४.४८ कोटी रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडाही जाहीर झाला; परंतु त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस अद्याप सुरूवात झालेली नाही. यावर्षी ५१० गावांमध्ये पाणीटंचाई जाणवणार असून त्यादृष्टीने वाशिम जिल्हा प्रशासनाने उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यात प्रामुख्याने जिल्ह्यातील ४९१ विहिरींचे अधिग्रहण आणि ७४ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची बाब प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील इतर जलस्त्रातोंप्रमाणेच विहिरींची पाणीपातळीही कमालीची खालावल्याने प्रशासन ४९१ विहिरींमधील पाणी कसे उपलब्ध करणार, हा गहण प्रश्न सद्या उपस्थित केला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापासूनच भीषण पाणीटंचाई जाणवू लागल्याने जनजीवन हैराण झाले असून जनावरांनाही पिण्याचे पाणी मिळेनासे झाले आहे. पुरेसे पाणी नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचा पेराही घटला असून अशा स्थितीत पाणीटंचाई कृती आराखड्यातील तरतुदीनुसार उपाययोजनांची अंमलबजावणी करताना जिल्हा प्रशासनाचीही चांगलीच दमछाक होणार असल्याचे दिसून येत आहे.
वाशिम जिल्हा प्रशासनाचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार; पण अंमलबजावणी शून्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 7:29 PM
वाशिम: गतवर्षीच्या पावसाळ्यात सरासरी पर्जन्यमानात ३० ते ४५ टक्के घट झाल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवला आहे. यासंदर्भात गत महिन्यात ४.४८ कोटी रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडाही जाहीर झाला; परंतु त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस अद्याप सुरूवात झालेली नाही.
ठळक मुद्देग्रामीण भागात उद्भवली पाणीटंचाईविहिरींची पाणीपातळीही खालावली