शिरपूरजैन : तब्बल ४ कोटी ८९ लक्ष रुपये खर्चून राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेत विविध स्वरूपातील त्रुटी असल्याने पाणीपुरवठा प्रक्रिया विस्कळित होत आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे ठिकठिकाणी पाईपलाईन लिकेज असण्यासोबतच इतर अडचणींमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पाणीटंचाईच्या काळात प्रशासनाने अंगिकारलेल्या उदासिन धोरणाप्रतीही नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.शिरपूरजैन हे मालेगाव तालुक्यातील तुलनेने सर्वात मोठे गाव असून गेल्या काही वर्षात गावच्या लोकसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामुळे पाण्याचीही गरज वाढलेली आहे. ही बाब लक्षात घेवून काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत गावात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, त्यात विविध स्वरूपातील त्रुटी असल्याने सद्य:स्थितीत पाणीपुरवठ्यातही अडचणी उद्भवल्या आहेत. नळाव्दारे पाणी सोडल्यानंतर ज्याठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे, त्याठिकाणाहून पाण्याचा अपव्यय होत आहे. गावात चार ते पाच ठिकाणी हा प्रकार नित्यनेम घडत असतो. याकडे ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष पुरवून किमान टंचाईच्या काळात तरी पाण्याची काटकसर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
जलवाहिनीला गळती ; शिरपूरात लाखो लिटर पाण्याचा अपव्यय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 3:18 PM
शिरपूरजैन : तब्बल ४ कोटी ८९ लक्ष रुपये खर्चून राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेत विविध स्वरूपातील त्रुटी असल्याने पाणीपुरवठा प्रक्रिया विस्कळित होत आहे.
ठळक मुद्देळाव्दारे पाणी सोडल्यानंतर ज्याठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे, त्याठिकाणाहून पाण्याचा अपव्यय होत आहे. गावात चार ते पाच ठिकाणी हा प्रकार नित्यनेम घडत असतो. प्रशासनाने अंगिकारलेल्या उदासिन धोरणाप्रतीही नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.