उंबर्डाबाजार - कारंजा सोहळा काळविटअभयारण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या उंबर्डाबाजार - सोमठाणा मार्गावरील जंगलात वनविभागाच्यावतीने तयार करण्यात आलेला वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा पाणवठा कित्येक महीन्यापासुन कोरडा ठण्ण अवस्थेत असल्याने वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवन भटकण्याची पाळी आली आहे.
वनविभागाच्या अधिकाºयांचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
कारंजा सोहळ काळविट अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात येणाºया उंबर्डाबाजार सोमठाणा या मार्गावरील जंगलात वनविभागाच्या वतीने एक पाझर तलाव तथा एक हातपंप व पाणी साठविण्यासाठी हौद निमाृण केला. यावर्षी आधीच पावसाळा कमी झाला असल्याने निसर्ग निर्मित पाण्याचे स्त्रोत केव्हाचेच आटले असुन पाझर तलावातील पाणी सुध्दा फेबु्रवारी महिन्यातच आटले आहे.
विशेष म्हणजे याच जंगलात एक कृत्रीम पाणवठा असुन यामध्ये हातपंपाव्दारे पाण्याचा हौदात पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र वनविभागाचे अधिकारी वर्ग या पाणवठ्याकडे फारसे फिरकुन पाहत नसल्याने गेल्या कित्येक महिन्यापासुन या पाणवठ्यात वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी भरण्यात आले नसल्याने वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची पाळी आली आहे. तरी वनविभागाच्या अधिकाºयांनी जंगलातील कृत्रीम पाणवठ्यात पाणी भरुन जंगलातील प्राण्यांना पाण्याची सोय करुन द्यावी अशी मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात आली आहे.