मंगरुळपीर : येथील पंचायत समिती सभागृहात राष्टीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत पाणी गुणवत्ता विषयक कार्यशाळा मोठ्या ऊत्साहात संपन्न झाली. यावेळी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या विस्तार अधिकारी कल्पना सावळे यांनी सखोल विविध प्रात्यक्षिकाव्दारे मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेची प्रस्तावना आरोग्य सहायक भिवरकर यांनी केली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी लाभलेले प.स. मंगरुळपीर कृषी अधिकारी शेळके यांनी सुरक्षीत,स्वच्छ,पारदर्शक पिण्याचे पाणी वापरण्याचा सल्ला दिला. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नव्हाते यांनी ८० टक्के दुषीत पाणी पिल्यामुळे होणा-या आजाराबाबत योग्य मार्गदर्शन केले.
सि.डी.पी. ओ. कार्यालय मंगरुळपीरचे राऊत यांनी लहान बालकांना दुषीत पाणी पिल्यामुळे होणारे रोग व त्यामुळे उदभवनारे कुपोषन याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर आरोग्य विस्तार अधिकारी कल्पना सावळे यांनी सखोल पाणी गुणवत्ता विषयक मार्गदर्शनास सुरवात केली ग्राम पंचातमध्ये ब्लिचिंग पावडर साठा ठेवण्याच्या पद्धती, तसेच विहीर, कुपनलीका, हातपंप परीसरातील स्वच्छता, पाणी नमुने प्रयोगशाळेत पाठवने, त्याच्या नोंदी ठेवने, गावातील नळयोजनेची पाण्याची टाकी स्वच्छ ठेवने, याबाबत मार्गदर्शन केले. पाणी गुणवत्ता निरिक्षक जि.प. वाशिमचे राजुरकर यांनी ओ.टी. तपासणी बाबत मार्गदर्शन केले. भुजल सर्वेक्षण उपविभागीय प्रयोगशाळा मानोरा येथील अवचार रसायनीतज्ञ यांनी पाण्यात असणारे रासायनिक व जैविक घटक याबाबत मार्गदर्शन केले. शेवटी कार्यशाळेचे आभार प्रदर्शन श्री सतिश मुंढे पाणी गुणवत्ता सल्लागार मंगरुळपीर यांनी केले . कार्यशाळेस यशस्वीरित्या पार पाडण्यास श्री माऊलकर आरोग्य सेवक प.स. मंगरुळपीर यांनी अतिशय परिश्रम घेतले.