वाशिम : गतवर्षी बºयापैकी पाऊस झाला असला तरी यंदा वाशिम तालुक्यातील ९० गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट राहण्याचा अंदाज तालुका प्रशासनाने वर्तविला आहे. पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही तालुका प्रशासनाने संबंधित यंत्रणेला दिल्या.२०२० मध्ये पावसाळ्यात बºयापैकी पाऊस झाला. त्यानंतर परतीच्या पावसानेदेखील शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आणले. तालुक्यातील १० बॅरेजसह २५ प्रकल्प तुडूंब होते. त्यामुळे उन्हाळ्यात तालुक्यातील गावांमध्ये फारशी पाणीटंचाई जाणवणार नाही, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. प्रकल्पांतील जलसाठ्यात झपाट्याने घट येत असल्याने पाणीटंचाईचे संभाव्य संकट गडद होत आहे. वाशिम तालुक्यातील ९० गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला असून, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यामध्ये विहिर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा, नळ योजनांची विशेष दुरूस्ती, कुपनलिका आदींचा समावेश आहे.
वाशिम तालुक्यातील ९० गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 5:03 PM