मंगरुळपीर : तालुक्यात प्रशासनाच्या ढिसाळ आणी ऊदासिन धोरणामुळे पाण्यासाठी नागरीकांची पायपिट सुरुच असल्याचे चित्र आहे. मंगरुळपीर-तालुक्यातील अनेक गावातील लोकांना सध्या भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक गावातील नळयोजना बंद पडल्या आहेत. लोकांना दोन दोन किलोमीटर पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अनेक ठिकाणी सध्या टँकर सुरू करण्या योग्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खेड्यापाड्यामध्ये तर गेल्या दहा पंधरा दिवसांआड नळाला पाणी येत आहे. लोक दोन दोन की.मी अंतरावरून पिण्याचे पाणी आणत आहेत. पाणी पुरवठा करणाºया विहिरी कोरडी पडली आहे. काही ठिकाणी कुपनलिका अधिग्रहण केल्या आहे. परंतू कुपनलिकेचे पाणी गावाला पुरत नाही. तालुक्यातील परिसरातील गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असुन बहूतांश गावात दलित वस्ती मधील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून येथील पाणी पुरवठ्याची व्यवस्था त्वरीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी गट विकास अधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.