लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : सांसद आदर्श ग्राम सायखेडा येथे गत तीन वर्षापूवी पाणी पुरवठा योजनेचे उदघाटन करण्यात आले होते. तेव्हापासून अद्याप या योजनेचे कामच सुरु असल्याने गावात पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे. गावकºयांना शेतातून पाणी आणण्याची वेळ आली आहे. मोलमजुरी सोडून पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ सायखेडावासियांवर येवून ठेपली आहे. पाणि पुरवठा विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण होत असून गावकºयांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.खासदार भावनाताई गवळी यांनी मंगरुळपीर तालूक्यातील सायखेडा हे गाव दत्तक घेतले आहे. तीन वर्षापूूर्वी ग्राम विकासाचा पाया रचल्या गेला आणि गावात पाणि टंचाई संकट या विषयाला गावकºयांनी संमती दिली व खासदार यांनी ६३ लाखाची पाईप लाईन, विहीर खोलीकरण, रुंदीकरण,जलकुंभासह मजूंर केले. या सर्व कामाचे उदघाटन ५ जानेवारी २०१७ रोजी मोठ्या थाटात उदघाटनही झाले.त्यावेळी गावकरी आनंदीत झाले परंतु तीव वर्ष पुर्ण होऊनही काम कासव गतीने सुरुच आहे. त्यामुळे ग्रामस्थाना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातिल महीला व शालेय विद्यार्थी घोटभर पाण्यासाठी वनवन भटकत आहेत . एवढेच नव्हेतर रस्ते,नाल्या, भुमीगत गटार विवीध कामे मंजूरात असतांही केवळ पाईप लाईनच्या खोदकामाने मंजूर कामे प्रलंबीत आहेत.आणि संबधित कंत्राटदाराने अनेक दिवसापासून ठिकठीकानी रस्ते खोदून ठेवल्याने गावकरी ञस्त झाले आहेत . तरी संबधितांनी याकडे लक्ष देवून येथील पाण्याची टंचाई दूर करण्याची मागणी सायखेडा ग्रामस्थांच्यावतिने होत आहे.
खासदार भावना गवळी यांनी दत्तक घेतलेल्या सायखेड्यात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 3:08 PM