लोकमत न्यूज नेटवर्कपार्डी ताड (वाशिम) : उन्हाळ्याच्या झळा तीव्र होण्यापूर्वीच पार्डी ताड येथील कूपनलिका, विहिरीत कोरड्या पडल्या आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू असून, तहान भागविण्यासाठी ग्रामस्थ आतापासूनच टँकर विकत घेत असल्याचे भीषण चित्र पाहायला मिळत आहे.मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील नळ योजनेची विहीर तीन महिन्यांपूर्वीच आटली. त्यामुळे नळयोजना बंद झाल्यानंतर ग्रामस्थांनी खासगी विहीरी, हातपंपाचा आधार घेत पाणी उपसून गरजा भागविल्या. आता गेल्या महिनाभरापासून येथील हातपंप आणि विहिरीही कोरड्या पडल्याने गावात पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले आहे. काही लोक टँकर विकत घेऊन तहान भागवित आहेत; परंतु रोजमजुरी करून उदरनिर्वाह करणाºयांची मोठी पंचाईत झाली आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी गोरगरीब कुटूंबे मुलाबाळांसह वणवण भटकून पाणी आणत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि मजुरांच्या कामांवरही परिणाम होत असल्याने परिवारांवर उपासमारीची पाळीही येऊ लागली आहे. यावर पर्याय म्हणून काही परिवार रात्रीअपरात्री जीव धोक्यात घालत शेतशिवारातील विहिरीवरून पाणी आणत असल्याचे चित्र दिसत आहे. पार्डी ताड येथे गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना सोसावे लागत असताना प्रशासनाकडून ही समस्या मिटविण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात पार्डी ताड येथे गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थ वणवण भटकत आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी कुठलेही प्रयत्न प्रशासनाकडून अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी १८ फेब्रुवारी रोजीच ग्रामसचिव आणि मंगरुळपीर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना निवेदन सादर केले आहे. येत्या १ मार्च पर्यंत या समस्येवर नियंत्रणासाठी उपाय योजना न केल्यास तहसील कार्यालयावर महिला, बालकांसह घागरमोर्चा काढण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनावर ग्रा.पं. सदस्य जयश्री माचलकर, ग्रा.पं. सदस्य ताईबाई गावंडे, ग्रा.पं. सदस्य धर्मराज बिडकर, माजी सरपंच गणेश जटाळे, लक्ष्मण गायकवाड, पांडुरंग कोल्हे, गणेश वैद्य, आकाश लांभाडे, राजू खोरणे, मंगेश ठाकरे, सोमकांत लांभाडे, दादाराव ठाकरे, नितेश बोंदे्र, अशोक गायकवाड, विठ्ठल लाभांडे, ज्ञानदेव सुर्वे, बाबाराव खोरणे आदिंच्या स्वाक्षºया आहेत.
पार्डी ताडवासियांची पाण्यासाठी वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 3:41 PM