भर जहॉगीर : प्रकल्पात पुरेशा प्रमाणात जलसाठा असूनही भर जहॉगीर येथे ग्रामपंचायततर्फे दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.भर जहॉगीर येथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठ्याची सोय झाली आहे. येथून जवळच असलेल्या मोहगव्हाण लघुसिंचन प्रकल्पाजवळच जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत विहिर घेण्यात आली. यावर्षी पावसाळ्यात दमदार पाऊस झाल्याने प्रकल्पात बºयापैकी जलसाठा आहे. विहिरीमध्येदेखील जलसाठा आहे. असे असतानाही गावात दोन दिवसाआड तर कधी-कधी एका दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. दैनंदिन पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी गावकºयांमधून होत आहे.
गावकºयांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा म्हणून एक, दोन दिवसआड पाणीपुरवठा केला जातो. गावात १५०० लोक आहेत. काही भागात आज तर दुसºया भागात उद्या अशा पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येतो. गावात पाणीटंचाई नाही.- पी.के. चोपडे, सरपंच, भर जहॉगीर