00
दोन कोविड केअर सेंटर कार्यरत
वाशीम : जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे आरोग्य विभागावरील ताण वाढला असून, बाधितांवर उपचारासाठी बंद केलेले आणखी दोन खासगी कोविड हॉस्पिटलला मंगळवारी परवानगी देण्यात आली.
00
रोहयोंतर्गत पिंप्री येथे बहरली वनराई
वाशीम : मंगरुळपीर तालुक्यातील पिंप्री खु. येथे दोन वर्षांपूर्वी रोहयोंतर्गत प्रशासन व ग्रामपंचायतच्या सहकार्याने वृक्षलागवड करण्यात आली होती. आता हे वृक्ष चांगले वाढले असल्याने या ठिकाणी वनराई बहरल्याचे दिसत आहे.
000
बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी
वाशीम : रिठद येथे गत पाच दिवसात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या माहितीचे संकलन झाल्यानंतर १० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले.
000
तांदळी परिसरात आरोग्य तपासणी
वाशीम : वाशीम तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून, सोमवारी तांदळी शेवई येथे सात रुग्ण आढळल्याने परिसरातील गावात घरोघरी फिरून आरोग्य तपासणी सुरू केली आहे.
00
रोहित्रांना संरक्षक कठड्याचा अभाव
वाशीम : जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत रोहित्रांचे बॉक्स उघडे असून, संरक्षक कठड्याचा अभाव असल्याने अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे महावितरणने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
00
गोवर्धन येथील स्थितीचा आढावा
वाशीम : गेल्या आठवडाभरात गोवर्धन परिसरात ५०० पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेकडून नियमित आढावा घेण्यात येत आहे.
00
अनसिंग फाट्यावर वाहनांची तपासणी
वाशीम : जिल्हाभरात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यात वाशीम-पुसद मार्गावर मंगळवारी पोलिसांनी वाहनांची तपासणी केली. पाच दिवसापासून ही मोहीम सुरू आहे.
000
ग्रामीण रुग्णालयात स्वच्छतेची मागणी
वाशीम : रिसोड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही, यासह स्वच्छताही ठेवली जात नाही. याकडे रुग्णालय प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली.
00
पोलीस ठाण्यातील वाहने झाली भंगार
वाशीम : स्थानिक ग्रामीण पोलीस स्टेशनने गेल्या काही वर्षांत जप्त केलेल्या वाहनांचा निपटारा झाला नाही. यामुळे सदर वाहने ठाण्यात आवारात उभी राहून जागीच भंगार झाली आहेत. यामुळे विद्रुपीकरणात भर पडत असल्याचे दिसून येत आहे.
00
धनज बु, प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था
वाशीम : धनज बु. येथील प्रवासी निवाऱ्याची अवस्था दयनीय झाल्यामुळे प्रवाशांना रखरखत्या उन्हात वाहनांची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे नवीन निवारा हा मुख्य चौकात बांधावा, अशी मागणी महिला प्रवाशांकडून करण्यात येत आहे.