लोकमत न्यूज नेटवर्कजउळकारेल्वे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत जऊळका रेल्वे येथे तीन गावे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, जऊळका रेल्वे येथील पाणीपुरवठा ठप्प असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. महाराष्टÑ जीवन प्राधिकरणमार्फत साधारणत: १८ वर्षापुर्वी जउळका रेल्वे, उडी, वरदरी बु. या तीन गावांना पाणीपुरवठा व्हावा यासाठी जउळका रेल्वे येथे जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र व अन्य कामांचा शुभारंभ केला होता. सदर योजनेंतर्गतचे काम अतिशय संथगतीने करण्यात आले. दोन वर्षांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. आता तर जऊळका रेल्वे येथे पाणीपुरवठाही होत नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. गावातील हातपंपावर पाणी भरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जउळका गावालगत काटेपुर्णा नदीवर चाकातिर्थ प्रकल्पाची निर्मिती झाली. हा प्रकल्प सद्यस्थितीत तुडूंब भरलेला आहे. गावालगतच प्रकल्प असल्यावरही जउळका रेल्वे येथील नागरिकांना मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.दरवर्षी लाखो रुपये खर्च करून थातूरमातूर पाणीपुरवठा केला जातो. पाणीटंचाईवर कायमस्वरुपी तोडगा नसल्याने या योजनेवर करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याच्या संतप्त प्रतिक्रिया गावकºयांमधून उमटत आहेत. कायमस्वरुपी उपाययोजनेचा अभावपावसाळा संपत नाही; तेच जउळका रेल्वे येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने तीन गावे पाणीपुरवठा योजना अंमलात आली. मात्र, योग्य नियोजनाअभावी सदर योजनाही जऊळकावासियांची तहान भागविण्यात यशस्वी होऊ शकली नसल्याचे वास्तव आहे. जऊळका रेल्वे येथील पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेंतर्गत नियमित पाणीपुरवठा सुरू राहण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व अन्य यंत्रणेने नियोजन करणे गरजेचे आहे.
जऊळका रेल्वे येथील पाणीपुरवठा योजना ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 3:01 PM