शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

पावसाळ्यातही १७५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा!

By admin | Published: August 15, 2015 12:31 AM

वाशिम जिल्ह्यात सात टँकर, अमरावती विभागात ३७ टँकर.

संतोष वानखडे /वाशिम : पावसाळ्याला सुरूवात होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तथापि, राज्यातील काही गावे व वाड्यांमध्ये अद्यापही पाणीटंचाईची धग कायम आहे. राज्यातील १७५१ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, यामध्ये अमरावती विभागातील २१ गावांमधील ३७ टँकरचा समावेश असल्याची नोंद राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दप्तरी आहे. विविध कारणांमुळे ऋतूमानात बदल होत असल्याचा अनुभव सजीवसृष्टी घेत आहे. पावसाचे कमी प्रमाण आणि त्यातच जलपुनर्भरण व अन्य जलसंधारणच्या कामांबाबत जनजागृतीचा अभाव यामुळे जलपातळीत घट होत चालली आहे. यामुळे राज्यातील कित्येक गावांमध्ये हिवाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाणीटंचाईचे सावट असते. उन्हाळ्यात बहुतांश गावे पाणीटंचाईच्या चटक्याने होरपळून जातात, हे साहजिक आहे; मात्र भरपावसाळ्यातही राज्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते, ही विदारक स्थिती आहे. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छ विभागाच्या १0 ऑगस्ट २0१५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात तब्बल १७५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये २0४ शासकीय व १५४७ खासगी टँकरचा समावेश आहे. गतवर्षी हाच आकडा १५५६ असा होता. यावर्षी जून महिन्यात सुरूवातीला दमदार पाऊस झाला; मात्र जुलै महिन्यात पाऊस फितूर झाल्याने राज्यात १७५१ ठिकाणी पाणीटंचाईची तीव्रता निर्माण झाली. टंचाईग्रस्त भागातील नागरिकांच्या कोरड्या घशाला पाण्याचा ओलावा देण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाणीटंचाईची धग सर्वाधिक मराठवाड्यात आहे. येथे तब्बल ११८८ टँकर सुरू आहेत. नागपूर व कोकण विभागात पाणीटंचाई नसल्याची नोंद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दप्तरी आहे. अमरावती विभागात अकोला, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात पाणीटंचाई नसल्याने एकही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू नाही. वाशिम जिल्ह्यात दोन गावांत सात टँकर आणि बुलडाणा जिल्ह्यात १९ गावात ३0 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात पुणे २0, सातारा २७, सांगली २८, सोलापूर ८ असे एकूण ८३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नाशिक विभागात ४४३ टँकर सुरू आहेत.