लोकमत न्यूज नेटवर्कराजूरा (वाशिम) : येथील पाणी टंचाईची तिव्रता वाढलेली असतानाही, टँकरच्या प्रस्ताव धूळखात पडल्याचे वृत्त "लोकमत"ने २२ मे रोजीच्या अंकात प्रकाशित करताच, तालुका प्रशासनात एकच खळबळ उडाली. या वृत्ताची तातडीने दखल घेत टँकरचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानुसार २४ मे पासून टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला.गत काही वर्षांपासून राजूरा येथील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता मार्च महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी मे महिना संपत आला तरी टँकरने पाणीपुरवठा सुरू होत नव्हता. गावात जलस्त्रोत नसल्याने दूरवरून गावकऱ्यांना पाणी आणावे लागते. रात्री-अपरात्री जागून पिण्याचे व वापराचे पाणी आणण्यसाठी लहान बालकांपासून ते आबालवृद्धांना कसरत करावी लागते. मिळेल त्या ठिकाणावरून पाणी आणण्यासाठी गावकऱ्यांची पायपीट सुरू होती. ग्रामपंचायत प्रशासनाचेवतीने टँकरचा प्रस्ताव तहसीलकडे दाखल करण्यात आला. मात्र या प्रस्तावात त्रूटी असल्याचे कारण देत हा प्रस्ताव गत तीन महिन्यांपासून धुळ खात पडला होता. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी २० मे रोजी तहसीलदारांची भेट घेउन आपबिती कथन केली तसेच ह्यलोकमतह्णने २२ मे रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत तहसीलदार राजेश वझिरे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून टँकरचा प्रस्ताव निकाली काढला. त्यानुसार २४ मे रोजी टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला. एका विहिरीत टँकरचे पाणी टाकले जात आहे.
राजूरा येथे टँकरने पाणीपुरवठा !
By admin | Published: May 24, 2017 7:40 PM