लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरात कधीकाळी ठिकठिकाणी पक्क्या पाण्याच्या विहिरी होत्या. या विहिरींच्या पाण्यावरच नागरिकांची पाण्याची गरज भागत असे. सद्य:स्थितीत मात्र बहुतांश विहिरी कचरा टाकून अथवा ‘ले-आऊट’ला अडथळा ठरत असल्याने बुजविण्यात आल्या आहेत. यामागे प्रशासनाच्या बेफिकीरीसोबतच नागरिकांची उदासिनताही कारणीभूत मानली जात आहे. नव्या वसाहती विकसीत होण्यापूर्वी वाशिम शहरातील देवपेठ, गणेशपेठ, शुक्रवारपेठ, माहुरवेस, गोंदेश्वर, काळेफाईल, अल्लडाप्लॉट आदी जुन्या वसाहतींमध्ये पक्क्या पाण्याच्या विहिरींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यावरच नागरिकांची पिण्याच्या पाण्यासह वापरण्यासाठी लागणाºया पाण्याचीही गरज भागत असे. कालांतराने मात्र वाशिममध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होवून मुबलक पाणाी मिळायला लागल्याने नागरिकांनी विहिरींच्या जतनाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. विशेष गंभीर बाब म्हणजे कधीकाळी पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणून गणल्या जाणाºया विहिरी अडथळा ठरायला लागल्याने अनेक विहिरी दैनंदिन घरातून बाहेर पडणाºया कचरा टाकून बुजविण्यात आल्या; तर काही विहिरी ‘ले-आऊट’ विकसीत करित असताना बुजल्या गेल्या. त्यामुळे सद्या शहरातील विहिरींची संख्या जेमतेम असून दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणाºया भीषण पाणीटंचाईवर मात करणे यामुळे अशक्य ठरत आहे.
वाशिम शहरातील पाण्याच्या विहिरी बुजल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 6:00 PM