लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : कोरोनाचा परिणाम म्हणून बाजारपेठ मिळत असल्याने ग्राहकांना कवडीमोल भावात टरबूज विक्री करावी लागत आहे. उत्पादन खर्चही वसुल होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादित मालाची व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दराने मागणी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या नुकसानीबाबत सरकारसुद्धा कोणत्याच प्रकारची पावले उचलत नसल्याने शेतकरीवर्गासमोर मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना महामारीमुळे सर्वत्र हाहाकार माजला असताना दुसरीकडे मात्र कोरोनाच्या भीतीमुळे शेतीमालाला कवडीमोल दराने मागणी होत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शेतजमिनीत टरबूज लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी ३ महिने वेळोवेळी खते, औषधी, पाणी दिले; परंतु टरबूज विक्रीसाठी आल्यावर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. सर्व बाजारपेठा ११ वाजेपर्यंतच सुरू असून, इतर वेळेत बंद आहेत. यामुळे शेतातील तयार माल शेतातच पडला. परिणागू शेतातील भाजीपाला व फळे यांची कवडीमोल दराने व्यापारी मागणी करत आहेत. थेट विक्री करावे तर ऑटोचा खर्च, मजुरांचा हिशोब व माल घेऊन घरापर्यंत गेल्याने लोकांनी सुद्धा एक टरबूज पाच ते दहा रुपयाला देण्याची मागणी करत आहेत. शेतातच माल सडून जात असल्याने गावातच काडीमोल भावाने विक्री होत असल्याने टरबजू उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
टरबुजाचे भाव गडगडले; शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 11:05 AM