मान्सूनचे आगमन होऊन बरेच दिवस झाले; परंतु जिल्ह्यात १० जूनचा अपवाद वगळता पुढे सार्वत्रिक स्वरूपातील पाऊस झाला नाही. रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडेच गेले. त्यातच पाऊस आठ ते दहा दिवस लांबल्याचे चित्र आहे. दिवसा कडक ऊन्ह, तर रात्री आकाशात टपोरे चांदणे दिसत आहे. दिवसभरात काहीवेळ पावसाचे वातावरण तयार होते; मात्र पावसाचा थांगपत्ता नाही.
मृग नक्षत्रात जिल्ह्यात पावसाची संततधार अपेक्षित होती; पण पडणारा पाऊसही सार्वत्रिक नाही. त्यामुळे ज्या भागात पाऊस झाला, तेथील शेतकरी सुखावतो तर बाकीच्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यात ५० टक्के क्षेत्रावर यंदा खरिपाचा पेरा झाला आहे. पावसाने पाठ फिरविल्याने पेरणी केलेले शेतकरी चिंताग्रस्त असून उर्वरित शेतकरी अनुकूल परिस्थितीच्या प्रतीक्षेत आहेत.
.................
पावसाची स्थिती (मि.मी.)
१०३
अपेक्षित पाऊस
................
१६४.८
आतापर्यंत झालेला पाऊस
...................
मंगरूळपीर तालुका
९६ मि.मी.
सर्वात कमी पाऊस
...............
वाशिम तालुका
१४३ मि.मी.
सर्वात जास्त पाऊस
..............
कोठे किती पेरणी (हेक्टरमध्ये)
४,०६,२३४
अपेक्षित पेरणी क्षेत्र
...........
२,१९,१८७
आतापर्यंत झालेली पेरणी
..............
तालुकानिहाय पेरणी व झालेला पाऊस
वाशिम -
रिसोड -
मालेगाव -
मंगरूळपीर -
मानोरा -
कारंजा -
...........................
पेरणी (हेक्टरमध्ये)
वाशिम - ३७३८५
रिसोड - ४९२१६
मालेगाव - २८९३३
मंगरूळपीर - ४०४७३
मानोरा - २४५४६
कारंजा - ३८६३२
...........................
पीकनिहाय क्षेत्र
कापूस - १९२४५, १२२८२
तूर - ५४५०९, ३२६७९
मूग - ८२७२, १८२९
उडीद - १०१७९, ३८८
सोयाबीन - ३००४१७, १६८८२६
................
...तर खते-बियाणे कशी मिळणार?
यंदा चांगला पाऊस होणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता; मात्र झाले विपरितच. पाऊस नसल्याने पिके सुकत असून दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
- ज्ञानेश्वर इढोळे, शेतकरी
..................
आर्थिक अडचणीत असतानाही पेरणीसाठी बियाणे, रासायनिक औषध, खताची जुळवाजुळव केली. आता पावसाने दडी मारली. दुबार पेरणी करावी लागल्यास खत, बियाणे कशी मिळणार?
- गंगाधर पांढरे, शेतकरी
....................
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला बियाण्यांचे दर वाढलेले होते. ते नंतर कमी झाले. त्यामुळे दिलासा मिळाला; मात्र पेरणी उलटल्यास पुन्हा होणारा खर्च आवाक्याबाहेर जाणार आहे.
- दिलीप मुठाळ, शेतकरी