लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : मंगरुळपीर तालुक्याचे तहसीलदार किशोर बागडे गेल्या पंधरा दिवसापासून गावात रोज आपले कार्यालय मधील कामकाज आटोपून तालुक्यातील वॉटर कपमध्ये सहभागी असलेल्या गावात श्रमदान करण्यासाठी जात आहेत. ते आपल्या कार्यालयाची गाडीत एक मंडळ अधिकारी चौधरी , तालुका समन्वयक समाधान वानखडे यांना घेऊन संध्याकाळी जात आहेत. याची उत्सुकता कुटुंबाला पण दिसून आल्याने त्यांनी चक्क आपला लग्नाचा वाढदिवसचं कुटुंबासमवेत श्रमदान करणाºयांसोबत साजरा केला.गेल्या काही दिवसापासून तहसीलदार यांची एकच धडपड दिसून येत असल्याने कुटुंबानीही श्रमदान ठिकाणी आम्हाला येण्याचा म्हटले. यावेळी तहसीलदार यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवशी तेथे जावून कुटुंबासमवेत श्रमदान केले. श्रमदान करतांना कुणालाही याची भनक सुध्दा लागू दिली नाही. सर्व कामे आटोपून झाल्यानंतर रात्री किशोर बागडे यांचा सोबत असलेल्या मंडळ अधिकारी यांनी साहेबांच्या लग्नाचा वाढदिवस गावकºयांना रात्री खूप उशिराने सांगितले . सोबत आणलेला केक सलग समतरचरवर कापण्यात आला. पिंप्री खु. वाशीयांना हा अनुभव एकदम वेगळा होता , तहसीलदार यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस कुटुंबासोबत पिंप्री खु येथे श्रमदान करून साजरा केला त्यामुळे गावात श्रमदान करणाºया गावकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले. व गावातील जे गावकरी श्रमदान करण्यासाठी येत नाही त्यांना श्रमदान करण्यासाठी आणायला पाहिजे असे ठरले. यावेळी अकोला येथून भालचंद्र सुर्वे यांनी २१ हजार रुपये मशीन काम करण्यासाठी डिझेलला ही रक्कम दिले तर त्याच ठिकणी भालचंद्र सुर्वे यांचे लहान बंधू पुरुषोत्तम सुर्वे यांनी वृक्ष संवर्धनसाठी १० हजार रक्कम या गावकर्यांना दिले .
श्रमदान करुन साजरा केला लग्नाचा वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 6:24 PM