मंगरुळपीर : ग्राहकांनी वीज देयके वेळेवर अदा करावीत म्हणून विविध फिडरवर भारनियमनात सवलती दिल्या आहेत.त्यात शेलूबाजार फिडरला वीज चोरीमुळे एफ ग्रुपचा वीज पुरवठा केला जात आहे.त्यामुळे जादा प्रमाणात होणार्या वीजभारनियमनाची झळ शेलुबाजारसह परिसरातील १४ गावातील वीजग्राहकांना सोसावी लागत आहे.तालुक्यातील शेलूबाजार ३३ के.व्ही सब स्टेशनवरून तर्हाळा-१३,कंझरा-२ व शेलूबाजार फिडरवरून १४ गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच वनोजा पाणी पुरवठा योजनेकरिता एक्सप्रेस फिडर आहे तर कृषी पंपाकरिता स्वतंत्र फिडर देण्यात आलेले आहे.घरगुती वीज ग्राहकांना वीजपुरवठा करण्याकरिता गावठाण फिडरची निर्मिती करण्यात आली आहे त्यामुळे कृषी पंप व गावठाण फिडरच्या भारनियमनाच्या वेळा वेगवेगळ्या आहेत.परंतु, कृषी पंपाच्या वीजपुरवठयाकडे महावितरण कार्यालयाचे साफ दुर्लक्ष असल्याने शेतकर्यांना भारनियमनाच्या वेळे व्यतिरिक्त वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याने कृषीपंपधारक शेतकरी दोन्ही वाहिनीच्या क्रॉसिंगच्या ठिकाणी गावठाण फिडरच्या वाहिनीवरून कृषी पंपाकरिता अवैध वीजजोडणी करून ओलीत करतात.त्यामुळे गावठाण फिडरवरून कृषी पंपांकरिता मोठय़ा प्रमाणावर वीजचोरी होत असल्यामुळे वीजगळती जास्त प्रमाणात असल्याच्या कारणावरुन घरगुती जोडणीधारक मोठय़ा प्रमाणात भारनियमनाची झळ बसत आहे कृषी वाहिनीकडे महावितरण कार्यालयाने विशेष लक्ष दिल्यास ही समस्या मार्गी लागूृ शकते.त्यामुळे शेलूबाजार फिडरचे रॅकींग वसुलीच्या जोरावर एफवरून सी ग्रुपमध्ये येऊ शकते.तसे झाल्यास अतिरिक्त वीजभारनियमनातून ग्राहकांची सुटका होऊ शकते. कंझरा फिडर वर दोनच गावाचा लोड आहे या फिडरवर वरून गोगरी,हिरंगी,खेर्डा बु,खेर्डा खु अशी चार गावे जोडुन दिल्यास शेलूबाजार फिडरवरील गावाचा ताण कमी होऊ शकतो. मात्र हे करण्यासाठी महावितरणच्या अधिकार्यांना वेळ नसल्याचे दिसून येत आहे.यासंबंधात महावितरणच्या अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांचे मोबाईल स्वीच ऑफ असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.
वीजचोरीमुळे भारनियमनाचा फटका
By admin | Published: June 17, 2014 7:56 PM