लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पावसाच्या हलक्या सरींसह गणरायांचे वाशिम जिल्हय़ात शुक्रवारी जल्लोषात स्वागत झाले. ‘गणपतीबाप्पा मोरया, मंगलमू र्ती मोरया’ या घोषणेसह ढोलताशांच्या गजरात मूर्तींची हर्षोल्हासात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. रात्री उशिरापर्यंंत जिल्हय़ातील शहरी भागात २४५ तर ग्रामीण भागात ४४१ अशा एकंदरीत ६८६ सार्वजनिक गणेश मंडळांकडून ‘श्रीं’ची स्थापना करण्यात आली. यामध्ये २१0 गावांत एक गाव-एक गणपती या उपक्रमाचादेखील समावेश आहे.वाशिम येथे रिमझिम पाऊस, भक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह, ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, जागोजागी वाहतुकीची कोंडी आणि रस्त्यांवरचे लहान-मोठे खड्डे चुकवत बाप्पा घरोघरी पोहोचले. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी मोठय़ा संख्येने श्रींची स्थापना करण्यात आली. सकाळच्या सत्रात घरगुती गणेशमूर्तीच्या खरेदीसाठी वाशिम शहरातील नगर परिषद चौक मार्ग, पाटणी चौक आदी ठिकाणी भाविकांची झुंबड उडाली होती. पूजेचे साहित्य आणि गणेशमूर्तीसह मोरयाचा गजर दिसून आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नगर परिषद चौक या दरम्यान स्थानिक विठ्ठलवाडी मंगल कार्यालयाजवळचा रस्ता पोलिसांनी दुचाकी वाहनांसाठी बंद ठेवला होता. सायंकाळपर्यंंत हा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलला होता. गणरायांसमोर आरास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य स्थानिक पाटणी चौकस्थित बाजारात उपलब्ध होते. दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांंनी मिरवणुकीद्वारे मूर्तींंची प्रतिष्ठापना केली. गणेशोत्सवादरम्यान शांतता राखावी यासाठी पोलीस प्रशासनानेतर्फे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रिसोड शहरासह तालुक्यात सर्वत्र बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यासाठी भक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. सकाळपासूनच श्रींच्या मू र्ती घेऊन जाण्यासाठी गाव, गल्लीतून वाजत-गाजत भक्त रिसोड शहरात दाखल झाले होते. कारंजा, मालेगाव, मानोरा व मंगरूळ पीर येथे ढोल-ताशांचा निनाद व मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात श्रींची भव्य मिरवणूक काढून स्थापना करण्यात आली. ग्रामीण भागातही मोठय़ा उत्साहात भक्तांनी स्वागत केले. लाडक्या गणरायांच्या स्वागतासाठी घरातील आबालवृद्ध आणि मंडळातील कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून तयारीमध्ये गुंतले होते. शुक्रवारपासून या आनंद सोहळ्याला सुरुवात झाली. आता पुढील दहा दिवस जिल्हय़ाच्या कानाकोपर्यात ‘मोरयाङ्घमोरया’चा जयघोष होणार आहे.
बाप्पांचे जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 1:44 AM
पावसाच्या हलक्या सरींसह गणरायांचे वाशिम जिल्हय़ात शुक्रवारी जल्लोषात स्वागत झाले. ‘गणपतीबाप्पा मोरया, मंगलमू र्ती मोरया’ या घोषणेसह ढोलताशांच्या गजरात मूर्तींची हर्षोल्हासात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. रात्री उशिरापर्यंंत जिल्हय़ातील शहरी भागात २४५ तर ग्रामीण भागात ४४१ अशा एकंदरीत ६८६ सार्वजनिक गणेश मंडळांकडून ‘श्रीं’ची स्थापना करण्यात आली. यामध्ये २१0 गावांत एक गाव-एक गणपती या उपक्रमाचादेखील समावेश आहे.
ठळक मुद्दे६८६ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना ‘गणपती बाप्पां’च्या गजराने शहर दुमदुमले