लोकमत न्यूजनेटवर्क शिरपुर जैन : रिसोड येथून संत नगरी शेगाव येथे गेलेल्या पायदळ गजानन महाराज यांच्या पालखीचे परतीच्या प्रवासादरम्यान शिरपुर जैन ७ डिसेंबर रोजी भक्तीपूर्ण स्वागत करण्यात आले.
दरवर्षी डिसेंबर महिन्यात रिसोड येथील शेकडो गजानन भक्ताच्या सहवासात संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळा शेगाव येथे जात असतो. पालखी सोहळा रिसोड येथून मेहकर मार्गे शेगाव येथील नेण्यात येतो. तेथून बाळापूर ,पातूर , नागरतास, मालेगाव या मार्गाने पालखी सोहळाचे सात डिसेंबर रोजी शिरपूर नगरीत आगमन झाले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्थानिक विलास वाघमारे यांच्या कुटुंबियाकडून व गावातील गजानन भक्तांकडून पालखी सोहळ्याचे भक्तिपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्यातील भाविकांना व भक्तांना वाघमारे परिवारातर्फे दुपारचे भोजन देण्यात आले. दुपारच्या भोजनानंतर गजानन महाराजांचा जयघोष करीत पालखी सोहळा रिसोडच्या दिशेने रवाना झाला. यावेळी वंदना गाभणे, कमलबाई वाघमारे, डॉक्टर शुभांगी वाघमारे, दिपाली वाघमारे, अमित वाघमारे, डॉक्टर आशिष वाघमारे, भरत वाघमारे,गजानन गाभणे, प्रकाश शिरपूरकर, ओंकार चोपडे, वसंता भालेराव, विष्णू जहिरव, मनोहर बुकसेटवर, किशोर चोपडे, नीलेश शर्मा, सह गावातील गजानन भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.