लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आचार्य विद्यासागर महाराजांचे विदर्भ, मराठवाडा दक्षीणेतील आगमन व्हावे याकरिता संयम सदभावना पदयात्रेचे आयोजन कृथंलगीरी जि.उस्मानाबाद या तिर्थक्षेत्रापासून १३ सप्टेंबरला सुरु झाले व ५ आॅक्टोंबरला रामटेक येथे पदयात्रेचे समारोप होणार आहे. ही पदयात्रा २५ सप्टेंब र रोजी मिरवणुक वाशिम शहरातुन काढण्यात आली. यावेळी पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. या पदयात्रेमध्ये अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, पर्यावरण संतुलन, राष्ट्रीय एकात्मता आदिबाबत लोकांमध्ये जागृती करण्यात आली.पदयात्रेतील यात्री रोज ३० ते ३६ कि़मी.चालत आहेत. सदर पदयात्रा हिंगोली नाका येथुन निघुन राजनी चौक मार्गे अॅबेझर पार्श्वनाथ मंदिर व आदिनाथ मंदिराचे दर्शन जैन भवन येथे या पदयात्रेचे सभेमध्ये रुपांतर झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी ब्रम्हचारी तात्याभैय्या होते. तसेच मंचावर प्रमुख अतिथी म्हणुन बंडु भैय्या, सुनिलभैय्या ,प्रकाशभैय्या, विशालभैय्या, उदय लेंगडे, राजकुमार चौगुले, पवन अंबुरे, संतोष पांगळ, महाविर जैन, डॉ.सुरेश गोसावी, शांतीनाथ चौगुले, नितीन शहा, कुबेर चौगुले, बाहुबली लडे, डॉ.शांतीनाथ चौगुले, सागर पाटील, सागर पाटील, विजय चौगुले हे पदयात्रेचे संयोजक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.वैशाली वालचाळे यांनी केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, पर्यावरण संतुलन, राष्ट्रीय एकात्मतेचा साधण्याकरिता मनाचा व शरिराचा संयम आवश्यक आहे असल्याचे सांगितले. तात्याभैय्या यांनी आचार्यश्री यांना दक्षीणेकडे विहार व्हावा व हा विचार करत असतांना विदर्भ, मराठवाडा, दक्षीण महाराष्ट्र या भागात व्हावा याकरिता सर्वांनी पदयात्रेत सामील होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमामध्ये मोहनलाल वालचाळे ,रमेश बज, विनोद गडेकर, कमलाकर भुरे, बापु महाराज, अक्षय जोगी, चंद्रशेखर उकळकर, अॅड.बज हे सुध्दा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत जैन समाजातर्फे करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सन्मती हरसुले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद मानेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रवि बज, सचिन गोधा, प्रविण राऊत, विरेंद जोगी, हरिष बज, सचिन बज, संतोष जोगी, प्रदीप चाणेकर, प्रविण वाळले, रविकुमार पाटणी, रविंद्र कान्हेड, कुलभुषण वाकळे, आदेश काहान, श्रेणीकजी भुरे, आतीष गंगवाल, प्रविण पाटणी, किशोर महाजन, उज्वला उकळकर, मुकूंद वालचाळे ,प्रदीप बांडे, आदिंनी परिश्रम घेतले.याप्रसंगी जैन समाज वाशिम, रिसोड, हराळ, अनसिंग, शिरपूर, मालेगाव येथील श्रावक उपस्थित होते.
वाशिम येथे संयम स्वर्ण सद्भावना पदयात्रेचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 8:17 PM
वाशिम : आचार्य विद्यासागर महाराजांचे विदर्भ, मराठवाडा दक्षीणेतील आगमन व्हावे याकरिता संयम सदभावना पदयात्रेचे आयोजन कृथंलगीरी जि.उस्मानाबाद या तिर्थक्षेत्रापासून १३ सप्टेंबरला सुरु झाले व ५ आॅक्टोंबरला रामटेक येथे पदयात्रेचे समारोप होणार आहे. ही पदयात्रा २५ सप्टेंब र रोजी मिरवणुक वाशिम शहरातुन काढण्यात आली. यावेळी पदयात्रेचे स्वागत करण्यात आले.
ठळक मुद्देकृथंलगीरी जि.उस्मानाबाद या तिर्थक्षेत्रापासून सुरु झाली पदयात्रा वाशिम शहरातुन काढण्यात आली मिरवणुक