ऑनलाइन लोकमतमानोरा (वाशिम) : स्थानिक पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या दापुरा येथील शेतकरी रामहरी नत्थुजी चौधरी (वय ७० वर्षे) यांनी आपल्या स्वत:च्या शेतात खोदकाम सुरू असणाऱ्या विहिरीत वाकून पाहिले. यावेळी त्यांचा तोल गेल्याने ते विहिरीत पडले. उपचारादरम्यान त्यांचा १६ मे रोजी मृत्यू झाला.याबाबत प्राप्त माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी दापुरा येथील शेतकरी चौधरी यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते. त्यांनी विहिरीत वाकून पाहिले असता तोल जाऊन ते आत पडले. त्यांच्या छातीला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्यांना नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा १६ मे रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी प्राप्त वैद्यकीय अहवालावरून मानोरा पोलिसांनी आज मर्ग दाखल केला आहे.