..................
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
वाशिम : शहरातील विविध बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यासह सॅनिटायझरची व्यवस्थाही राहत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
............
रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
वाशिम : शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी संदीप गोटे यांनी केली आहे.
................
रोजगार ठप्प; कर्ज फेडण्याची चिंता
वाशिम : कोरोनाच्या संकटामुळे येत्या शैक्षणिक सत्रातही शाळा सुरू होतील किंवा नाही, याबाबत संभ्रम कायम असल्याने ऑटोचालकांचा रोजगार ठप्प झाला आहे. कर्ज कसे फेडावे, ही चिंता त्यांना सतावत आहे.
..................
‘ऑॅडिट’चा प्रश्न अद्याप प्रलंबित
वाशिम : जिल्ह्यातील व्यापारी संकुलांमध्ये कधीकाळी आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्याची कुठलीच ठोस सोय नाही. या धर्तीवर संकुलांचे फायर ऑडिट करणे आवश्यक आहे; पण हा प्रश्न प्रलंबित आहे.
................
रस्त्यांच्या कडेला वृक्षलागवडीची मागणी
वाशिम : वाशिम ते अनसिंग या रस्त्याचे रुंदीकरण करत असताना वृक्ष तोडण्यात आले. त्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी नव्याने वृक्षलागवड करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
...............
अवैध रेती उपशावर कारवाईच्या सूचना
वाशिम : नदीघाटांवरून चोरट्या मार्गाने अवैध रेती उपसा सुरूच असून या प्रकरणी ठोस स्वरूपात कारवाई करावी, अशा सूचना जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिल्या आहेत.
.............
वाहन परवाना मिळण्यास विलंब
वाशिम : कोरोनाकाळात वाहन परवाना मिळण्यास अर्ज केलेल्या अनेकांना परवाना मिळालेलाच नाही. हा प्रश्न विनाविलंब निकाली काढण्यात यावा, अशी मागणी यश कडू, मंगेश कडू यांनी केली.
...............
संत्रा उत्पादक न्यायाच्या प्रतीक्षेत
वाशिम : गतवर्षी लॉकडाऊन काळात हैदराबादच्या कोल्ड स्टोरेजमधून दलालाने संत्रा परस्पर विकला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करूनही संबंधित संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही.
..............
इंधनाचे दर वाढल्याने नागरिक हैराण
वाशिम : पेट्रोल व डिझेल या इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा मोठा परिणाम झाला असून ऑॅटोचालक, मालवाहू वाहनधारक यासह इतरही नागरिक हैराण झाले आहेत.
..............
उपकेंद्रांची प्रलंबित कामे पूर्ण करा!
वाशिम : पैनगंगा नदीतील पाण्याचा सिंचनासाठी वापर व्हावा, यासाठी बॅरेजेस उभारण्यात आले. नदी क्षेत्रातील उपकेंद्रांची कामेही तत्काळ पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे.
...........
पोलीस केंद्राकडून वाहनचालकांचे प्रबोधन
वाशिम : अमानी महामार्ग पोलीस केंद्राकडून रविवारी वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात आले. अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत पोलीस उपनिरीक्षक नितीन दांदडे यांनी माहिती दिली.