शासनातर्फे ग्रामीण भागातही जिल्हा परिषद शाळांमध्ये सोयी, सुविधा पुरविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून शिक्षकांनी शैक्षणिक काम करणे अपेक्षित आहे. मात्र, गत काही वर्षांपासून शिक्षकांवर जनगणना, निवडणूकविषयक कामे, पोषण आहार वाटप, विविध प्रकारचे सर्वेक्षण, लसीकरणासाठी वयोगटानुसार सर्व्हे यासह अन्य प्रकारची अशैक्षणिक कामे सोपविण्यात येतात. यामुळे विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करणे अवघड होत आहे. निवडणूक व अत्यावश्यक कामे वगळता अन्य अशैक्षणिक कामे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर सोपवू नयेत, असा निर्णय यापूर्वीच न्यायालयाने दिलेला आहे. तथापि, अद्यापही काही अशैक्षणिक कामे शिक्षकांवर सोपविली जात असल्याने संघटनांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
०००
जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा - ७७६
एकूण शिक्षक - ३०००
०००००००००
२) शिक्षकांची कामे
अ) खिचडी शिजवून घेणे व मुलांना वाटप करणे.
ब) विविध प्रकारचे सर्वेक्षण, मतदार यादी, जनगणना.
क) ऑनलाइन पद्धतीने शाळांचे अहवाल भरणे, वरिष्ठांना पाठविणे.
००००००
अशैक्षणिक कामांसाठी एक शिक्षक
शिक्षण सोडून इतर कामांसाठीच अनेक शाळेत किमान एका शिक्षकावर जबाबदारी सोपविली आहे. इतर कामांसह वेगवेगळे अहवाल या शिक्षकाला भरावे लागतात. विविध प्रकारचे ऑनलाइन अहवालदेखील भरावे लागत असल्याने अर्धाअधिक वेळ या अशैक्षणिक कामांमध्येच जातो.
०००
एक शिक्षकी शाळेचे हाल
जिल्ह्यात एक शिक्षकी शाळा २५ आहेत. एक शिक्षकी शाळेत शिकविण्यासह सर्व कामे एकाच शिक्षकाला करावी लागतात. विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच अशैक्षणिक कामे करावी लागत असल्याने या शिक्षकांची मोठी पंचाईत होते. किमान अशा शिक्षकांना तरी अशैक्षणिक कामातून सूट मिळणे अपेक्षित आहे.
०००
शिक्षक संघटना काय म्हणतात?
कोट
पोषण आहार, लसीकरण मोहिमेत वयोगटानुसार सर्वेक्षण, मतदार यादी, बीएलओ, विविध शासकीय योजनांची जनजागृती,
ऑनलाइन पद्धतीने विविध प्रकारचे अहवाल भरणे आदी कामे शिक्षकांवर सोपविली जातात. यामुळे शिक्षकांची मात्र दमछाक होते.
- हेमंत तायडे,
जिल्हाध्यक्ष, कास्ट्राइब महासंघ
००००
शिक्षकांव्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांवर अन्य कामे शक्यतोवर सोपविली जात नाहीत. शिक्षकांना शैक्षणिक कामाबरोबरच अशैक्षणिक कामेही करावी लागतात. अशैक्षणिक कामांचे ओझे कमी झाले तर बरे होईल.
- विनोद घुगे
जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती
०००००
शिक्षणाधिकारी म्हणतात?
नियमानुसार निवडणूक, जनगणना आणि आपत्ती व्यवस्थापनांतर्गतची अत्यावश्यक कामे शिक्षकांवर सोपविली जातात. त्याव्यतिरिक्त इतर कोणतेही अशैक्षणिक काम शिक्षकांवर सोपविले जात नाही.
- गजानन डाबेराव
उपशिक्षणाधिकारी, वाशिम