------
रस्त्यावरील पाण्यामुळे अडचणी
वाशिम: तालुक्यातील दगड उमरा परिसरातील गावांच्या मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. यामुळे ग्रामस्थांना ये जा करण्यात अडचणी येत असून, या पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी सोमवारी ग्रामस्थांनी केली.
-------
पीक नुकसानाच्या मदतीची प्रतीक्षा
वाशिम: परिसरात गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानाच्या मदतीची प्रतीक्षा येथील शेतकऱ्यांना आहे. शासनाने गत महिन्यात वंचित शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर केला; परंतु ९ फेब्रुवारीपर्यंतही काही शेतकऱ्यांना या निधीतून मदत मिळाली नाही.
-
हवामान यंत्राची दैना
वाशिम: सुमारे तीन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना हवामानाची माहिती देण्यासाठी तालुक्यात सहा ठिकाणी स्कायमेट कंपनीच्यावतीने स्वयंचलित हवामान यंत्र स्थापित करण्यात आले; परंतु हे यंत्र नादुरुस्त झाले असून, काहींची मोडतोड झाल्याचे मंगळवारी दिसून आले.